Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांनी खळखळून हसले पाहिजे : बिभीषण धनवडे

जामखेड शहरात रंगला खेळ पैठणीचा

जामखेड प्रतिनिधी ः महिलांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात मन मोकळे व खळखळून हसता यावं. एकत्र येऊन विरंगुळा घेता यावा याच हेतूने जामखेड शहरात मकरसंक्र

शेवटी महिलाच उतरल्या राखेसाठी रस्त्यावर l पहा LokNews24
खा.विखे यांच्या माध्यमातून शहराचा अनुशेष भरून काढू -: माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड
शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले

जामखेड प्रतिनिधी ः महिलांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात मन मोकळे व खळखळून हसता यावं. एकत्र येऊन विरंगुळा घेता यावा याच हेतूने जामखेड शहरात मकरसंक्रांतीनिमित्ताने हळदी कुंकू व खेळ पैठणीचा तसेच  सन्मान महिलांचा या न्यु होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे नगरसेवक तथा भाजपाचे शहराध्यक्ष बिभिषण धनवडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सांगितले.

नगरसेवक बिभिषण धनवडे मित्र मंडळ व जगदंबा महिला मंडळाच्या वतीने लना होशिंग विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला महीलांची तौबा गर्दी झाली होती. यावेळी अभिनेता क्रांती  (नाना) मळेगांवकर यांनी सादर केलेल्या गप्पा, गोष्टी, रंजक खेळासोबत गावरान काँमीडीचा तडका व खेळ पैठणीचा या कार्यक्रमांनी धमाल केली. तसेच बालगायीका टी. व्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर हिने आपल्या गायिकीने महिलांची मने जिंकली. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती व आ. प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी सौ. आशाताई शिंदे, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ ज्ञानेश्‍वर झेंडे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, प्रा.अरूण वराट, रमेश वराट, सुमीत वराट, गोरख घनवट, श्याम धस, संजय राऊत, सलीमभाई तांबोळी, प्रा कैलास माने, सलीमभाई बागवान, महेश मासाळ, तात्याराम पोकळे, मोहन मामा गडदे , जयसिंग उगले, वैभव कार्ले, ऋषीकेश मोरे, रवी सुरवसे, लहू शिंदे, उद्धव हुलगंडे, प्रविण चोरडिया, डॉ. विठ्ठल राळेभात, विकी उगले यांच्या सह जगदंबा महीला मंडळाच्या महीला भगीनींसह  विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित मोठ्या प्रमाणात होती. यावेळी महिलांनी विविध खेळ खेळले. विविध गाण्यावर नृत्य केले. नगरसेवक बिभिषण धनवडे मित्र मंडळाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला.

पल्लवी गोलेकर यांनी जिंकली पैठणी – बिभिषण धनवडे मित्र मंडळ आयोजित खेळ पैठणीचा मध्ये पहिल्या नंबरची पैठणी पल्लवी तुषार गोलेकर यांनी जिंकली तर दूसरी अनिता मारूती गिते, तिसरी दैवशाला गणेश गूळवे, चौथी संध्या अनंता आष्टेकर, पाचव्या नंबरची पैठणी वर्षा सागर माकुडे यांनी जिंकली.

COMMENTS