मुंबई/प्रतिनिधी ः स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी शुभवार्ता असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने तब्बल 8 हजार

मुंबई/प्रतिनिधी ः स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी शुभवार्ता असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने तब्बल 8 हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. एमपीएससीच्या इतिहासात आयोगाकडून कधीही 2 हजार पेक्षा अधिक जागांसाठी जाहिरात काढण्यात आलेली नव्हती. मात्र शुक्रवारी आयोगाने तब्बल 8 हजार पदांपेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात काढली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेंची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी ही मोठी संधी आहे.
आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. कोरोनामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मेगा भरती करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारने तब्बल 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच परिणाम म्हणून लोकसेवा आयोगाने तब्बल 8 हजारांपेक्षा अधिक पदांसाठी जाहीरात काढण्यात आलेली आहे.
यामध्ये सर्वात जास्त लिपिक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यासाठी तब्बल 7034 पदे भरण्यात येणार आहे. तर सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 70 जागा असून, राज्य कर निरीक्षक 159 जागा असून, पोलिस उपनिरीक्षक पदाच्या 374 जागा भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. आतापर्यंत दोन हजार पदांपेक्षा जास्त पदांची जाहिरात एमपीएससीने प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे पहिल्यांदाच आठ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याशिवाय देशाच्या प्रशासकीय इतिहासातही एवढ्या पदांची भरती लोकसेवा आयोगामार्फत राबवली जाणे दुर्मीळ आहे. एकाच अर्जाद्वारे विविध पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीतील चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या परीक्षा 8 फेब्रुवारीला होणार आहेत. एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नगरविकास, विधी आणि न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य, सार्वजनिक आरोग्य या विभागातील पदांसाठी गेल्यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान जाहिरात प्रसिद्ध केली होती.
सहायक कक्ष अधिकारी – 70 पदे
वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – 159 पदे
गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक – 374 पदे
दुय्यम निबंधक (श्रेणी -1)/मुद्रांक निरीक्षक – 49 पदे
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – 6 पदे
तांत्रिक सहायक – 1 पद
कर सहायक – 468 पदे
लिपिक टंकलेखक – 7034 पदे
COMMENTS