Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ खडसे आठवडाभरापासून नॉट रिचेबल !

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपमध्ये झालेली राजकीय कोंडी आणि राज्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार यामुळे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी

शासकीय औद्योगिक संस्थेत विद्यार्थ्यांनी गिरवले योगाचे धडे
समीर वानखेडेंच्या घरावर सीबीआयचा छापा
आंदोलनातून कोरोनाचे संकट पोचविणे हे नेतृत्वाचे लक्षण नव्हे ; मुख्यमंत्री ठाकरे यांची भाजपवर घणाघाती टीका

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपमध्ये झालेली राजकीय कोंडी आणि राज्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार यामुळे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल असे वाटत असतांनाच, राज्यात सत्तांतर झाले. मात्र आता एकनाथ खडसे गेल्या आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाथाभाऊ अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीचे दिग्गज नेते म्हणून ओळख आहे. ते नेहमी आक्रमकपणे भूमिका मांडत असतात. खडसे हे कधी माध्यमांपासून दूर राहत नाही. अनेकदा ते राज्यातील राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका मांडत असतात. मात्र, गेल्या 8 दिवसांपासून ते नॉटरिचेबल असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  दरम्यान, मध्यंतरी एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. खडसे यांनी आपली सून रक्षा खडसे यांच्यासह भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. मात्र, ही भेट खासगी असल्याचे कारण सांगत खडसेंनी भाजप प्रवेशाची चर्चा खोडून काढली होती.

COMMENTS