Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कितीही वादळे येऊ द्या, लातूरचा देशमुख वाडा तिथेच

भाजप प्रवेशाच्या चर्चांवर आमदार अमित देशमुखांचे वक्तव्य

सांगली/प्रतिनिधी ः गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली. यानंतर

आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतले खंडोबाचे दर्शन
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन
अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षेसाठी उपाययोजना राबवाव्यात

सांगली/प्रतिनिधी ः गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली. यानंतर काँग्रेसचे अनेक नेते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, भाजप प्रवेशाच्या चर्चेवर आता अमित देशमुखांनी भाष्य केले आहे. कितीही वादळे आली. कितीही वारे आले, तरी लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहील, असे खणखणती उत्तर काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांना दिले आहे.

विशेष म्हणजे लातूरचे प्रिन्स भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र, त्यांना आमचा विरोध असल्याचे संभाजी पाटील – निलंगेकरही म्हणाले होते. या प्रकरणावरही अमित देशमुख यांनी अखेर मौन सोडले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली. तेव्हाच अमित देशमुख, धीरज देशमुख आणि अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली. त्यात वंचित बुहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याने राळ उडाली. त्यांनी आता काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिले नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर बसतील म्हणत या चर्चेचा चांगलीच फोडणी दिली.
सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, तूर्त तरी सध्या महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे, असे मानावे लागेल. हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

त्यामुळे शांतता राखा कोर्ट सुरु होणार आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हा प्रश्‍न पडला आहे. पाच वर्षे चमत्कारिक राहिली. महाराष्ट्रात पहिले अडीच दिवसांचे, दुसरे अडीच वर्षाचे आणि आता तिसर्‍या सरकारचा कार्यकाळ सुरु आहे. चौथे सरकार कधीही येऊ शकते, अशी मिश्कील टीप्पणी अमित देशमुख यांनी केली. महापालिका निवडणुका कधी होतील हे सुद्धा सांगता येत नाही. सध्या आपण अस्थिर परिस्थितीला तोंड देत आहोत. संजय काका पाटील भाजपात या म्हणत आहेत, पण तुम्हीच स्वगृही परतावे. तसेच, लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली, कितीही वारे आले तरी तो तिथेच राहणार, असे स्पष्टीकरण अमित देशमुख यांनी दिले आहे. दरम्यान, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर गुरुवारी प्रतिक्रिया दिली होती. भाजपात अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे. पण, लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हते तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते. आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीची काम लपवण्यासाठी भाजपात यायचे म्हणत आहेत. मात्र, हे काय येत नाहीत आणि आम्ही काय घेत नाही. त्यामुळे येणार्‍या काळात आम्हाला प्रिन्स नको, तर सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपात हवा, असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले होते.

महाराष्ट्रात चौथे सरकार कधीही येऊ शकते  – अमित देशमुख पुढे म्हणाले की, गेली पाच वर्षे चमत्कारिक होती. महाराष्ट्रातले पहिले सरकार अडीच दिवसांचे, दुसरे सरकार अडीच वर्षांचे, तर तिसर्‍या सरकारचा कार्यकाळ सुरू असून, चौथे सरकार कधीही येऊ शकते, असे भाकितही आमदार अमित देशमुख यांनी वर्तवले आहे.

COMMENTS