नगर शहरातील खड्ड्याला दिले मनपा आयुक्तांचे नाव : युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर शहरातील खड्ड्याला दिले मनपा आयुक्तांचे नाव : युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी-नगरमध्ये पडलेले खड्डे नागरिकांना त्रासाचे झाले असल्याने शहरातील राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्था अभिनव आंदोलने करीत आहेत. अहमदनगर शहर

कृषी खात्यातील योजना प्रत्यक्षात उतरवा ः आ. राजळे
विकासासाठी आम्ही कोणाबरोबरही जाऊ शकतो ; खा. डॉ. विखेंची स्पष्ट भूमिका
आई, ताई, बाबा, भाऊ, आजी-आजोबा मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाही सदृढ करा !

हमदनगर/प्रतिनिधी-नगरमध्ये पडलेले खड्डे नागरिकांना त्रासाचे झाले असल्याने शहरातील राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्था अभिनव आंदोलने करीत आहेत. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने मंगळवारी चक्क एका खड्ड्याचे नामकरण मनपा आयुक्त खड्डा असे करण्यात आले. या आंदोलनाची चांगलीच चर्चा सोशल मिडियातून आहे.
नगर शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून प्रत्येक नागरिकांना शहरांमध्ये फिरण्यासाठी खड्ड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांचे छोटे-मोठे अपघात होत आहे व नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठी देखील कठीण होत असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या संकल्पनेतून जुनी मनपा कार्यालय येथील बेग पटांगण समोरील रस्त्यावरील खड्ड्यांचे मनपा आयुक्त साहेब खड्डा असे नामकरण करण्यात आले. यावेळी सोशल मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष योगेश दिवाणे, युवक काँग्रेसचे योगेश काळे, विशाल कळमकर, आशिष गुंदेजा, प्रमोद अबुज, अक्षय शिंदे, ईश्‍वर जगताप, अजय मिसळ, महिला काँग्रेसच्या नलिनी गायकवाड, सुनीता बागडे आदी उपस्थित होते.

COMMENTS