Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांब्याचा पाणीप्रश्‍न न्यायालयीन लढाईत अडकणार ?

पुणतांबा प्रतिनिधी ः पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष ग्रामसभेत बघायला मिळाला. पाणी यो

परीटवाडीमधील सौरप्रकल्पामुळे वृक्षतोड
लातूर जिल्ह्यात पाच महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू | DAINIK LOKMNTHAN
शिवसेना त्यांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली

पुणतांबा प्रतिनिधी ः पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष ग्रामसभेत बघायला मिळाला. पाणी योजनेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले असून येणार्‍या काळात पाणी योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे. पाणी योजना न्यायालयीन लढाईत अडकणार काय अशी चर्चा सुरू असून पाणी योजनेच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष सुरू असून या संघर्षाच्या लढाईत मात्र सर्वसामान्य माणूस पाणी योजना चांगली झाली पाहिजे या अशाने बघत आहे.

जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत 17 कोटी 50 लाख रुपयांचे पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असताना योजनेच्या निकृष्ट कामाबाबत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, असून मागील आठवड्यात झालेल्या ग्रामसभेत निकृष्ट कामावरून सत्ताधारी विरोधकात शाब्दिक बाचाबाची होऊन आरोप प्रत्यारोप झाले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडणे यांनी या योजनेतील काम निकृष्ट पद्धतीने झाली असून त्याची चौकशी झाली पाहिजे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व पाणी कमिटी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत असून या योजनेची कामाची माहिती अधिकारी देण्यास टाळाटाळ करतात अधिकारी उडवडीचे उत्तरे देऊन जनते दिशाभूल करतात असा आरोप केला होता त्यावर पाणीपुरवठा कमिटी अध्यक्ष सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे यांनी पाणी योजनेचे काम डी पी आर नुसार सुरू असून योजनेतील त्रुटी राहिली असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील असे सांगितले. साठवण तलावातील दगड व मुरूम याची विल्हेवाट कशी लावली. या प्रश्‍नावरून देखील जोरदार बाचाबाची झाली त्यामुळे दगड व मुरूम याची विल्हेवाट कशी लावली. या मुद्द्यावरून देखील जोरदार बाजाबाची झाली पाहायला मिळाली. विकास आघाडीचे धनंजय जाधव यांनी देखील आक्रमकपणे पाणी योजनेतील त्रुटी डीपीआर बदलून गावातील काही भाग पाण्यापासून वंचित ठेवला वाड्या वस्त्यांसाठी योजना असताना ती अमलात आणली नाही. जुनी पाईपलाईन असताना नवीन पाईपलाईन काय टाकली या मुद्द्यावरून देखील जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले जनसेवा चे विजय धनवटे यांनी गावातील काही भागात पाईपलाईन टाकली गेली नाही मात्र काही भागात दोन ते तीन कुटुंबासाठी पाईपलाईन टाकली गेली हे योग्य आहे का असा सवाल उपस्थित करून अधिकार्‍याला धारेवर धरले होते. या योजनेच्या कामाची पाहणी अधिकार्‍यांनी केली नाही, हा मुद्दा गाजला पंधरा दिवसाच्या आत योजनेतील पाणी व त्रुटींबाबत पाणी करून अहवाल देण्यात येईल असे जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता बिन्नर यांनी सांगितले होते. अहवाल न दिल्यास पाणी योजनेची टेस्टिंग बंद करण्याचा ठराव करण्यात आला होता. पाणी योजनेच्या मुद्द्यावरून गावातील अवैध धंदे यातून गुंडगिरी वाढल्याचा आरोप करण्यात आला होता.

COMMENTS