Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात राज्य उत्पादन शुल्कने वर्षभरात 12 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे : बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणार्‍यांवर गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात

आम्ही रस्ते बांधण्यात तर, ते आमची कबर खोदण्यात व्यस्त
रघुनाथ अभंग यांचे निधन
ऊसतोडणी कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

पुणे : बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणार्‍यांवर गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात संबंधितांवर 1870 गुन्हे दाखल केले असून 2006 आरोपींना अटक केली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब समोर आली आहे. मद्याची अवैध निर्मिती, वाहतूक आणि विक्री यावर उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाया केल्या आहेत.

या कारवाईत 1870 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2006 आरोपींना अटक करण्यात आली आहेत. 200 पेक्षा जास्त चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच या कारवायांमधून 12 कोटी 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली. गेल्या वर्षभरात बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन केल्याप्रकरणी 1538 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच 1568 आरोपींना अटक करण्यात आली होती. या कारवायांमधून सात कोटी 91 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाच कोटी रुपयांचा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश मिळाले आहे, असेही राजपूत यांनी सांगितले. परराज्यातील जप्त केलेले मद्य 33 हजार 807.39 बॅरल, तर गावठी देशी, विदेशी आणि बिअर, अशा एकूण 22 हजार 200.89 बॅरल मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच चालू वर्षात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या 68 आणि 84 कलमान्वये एकूण 26 गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये 84 आरोपींना न्यायालयाने एक लाख 74 हजार 300 रुपयांच्या दंडाबरोबर शिक्षा सुनावली आहे, असेही अधीक्षक राजपूत यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मंगळवार पेठ, तळेगाव दाभाडे, ताडीवाला रस्ता, पिंपरी-चिंचवड, नारायण गाव आणि सासवड येथे गोदामे आहेत. या गोदामांत कारवायांत जप्त केलेली वाहने, मद्यसाठा, उत्पादनासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल ठेवला जातो. न्यायालयाच्या आदेशानुसार हा जप्त केलेला मद्यसाठा आणि उत्पादन साहित्य नष्ट केले जाते, असेही अधीक्षक राजपूत यांनी सांगितले.

COMMENTS