Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत गोदड महाराजांच्या नगरीत अतिरेक चालत नाही : आ. प्रा. राम शिंदे

कर्जत/प्रतिनिधी ः गेल्या 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. त्यानंतर कर्जत नगरपंचायत निवडणूकीत काय घडले हे जनतेने पाहिले आहे

लोणीच्या तंत्रनिकेतनची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम
तालुक्याच्या सर्वांगीण विकास वाटचालीत भक्कम उभे राहा – आमदार थोरात
Ahmednagar : तहसीलदार ज्योती देवरेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप : आमदार निलेश लंकेचा पलटवार l Lok News24

कर्जत/प्रतिनिधी ः गेल्या 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. त्यानंतर कर्जत नगरपंचायत निवडणूकीत काय घडले हे जनतेने पाहिले आहे. कर्जत नगरपंचायत निवडणूक काळात मी कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरासमोर मौन व्रत केले. श्री संत सदगुरु गोदड महाराज हे जागृत देवस्थान आहे. अवघ्या सहा महिन्यात मी पुन्हा आमदार झालो. महाराजांच्या नगरीत निती आणि नियतीचा खेळ चालतो. येथे अतिरेक चालत नाही. 2024 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत तुमच्या मनासारखा निकाल लागेल असा विश्‍वास आ. प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलतांना आ. शिंदे म्हणाले, मी मंत्री असतानाही माझा एवढा मोठा वाढदिवस साजरा झाला नव्हता. मात्र यावर्षी माझ्या वाढदिवसाचा सप्ताह सुरू झाला आहे. आमदार झाल्यानंतर कुकडीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवला. येथील जनता सोशिक आहे, पण लाचार नाही. स्वाभिमानी जनतेने सर्व ओळखले आहे. यामुळेच वाढदिवस एवढा मोठा होत आहे. तुमच्या मनात काय आहे हे मला कळले आहे. कर्जत- जामखेडमधील जनता माझ्याबरोबर आहे. यामुळे तुमच्या मनासारखे होईल असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी प्रवीण घुले मित्र मंडळाचे प्रमुख प्रवीण घुले यांचे जोरदार भाषण झाले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS