Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली परिसरात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकं

ब्राह्मणगावात रंगले सरपंच चषकाचा सामने
मुंबई सा.बां. विभागातील मध्य मुंबई वरळी विभागात कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांचा कोट्यावधींचा अपहार  
राहुल व सोनिया गांधींना ईडीची नोटीस | DAINIK LOKMNTHAN

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची तीव्रता मोजली असून याची तीव्रता 3.8 इतकी असल्याचे सांगितले. सुदैवाने या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होती. दरम्यान, पहाटे 1.19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. गेल्या काही महिन्यांत दिल्लीत अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

COMMENTS