Homeताज्या बातम्यासंपादकीय

शाक्तपंथी छत्रपती संभाजी महाराज ! 

साऱ्या जगावर प्रभाव आता इंग्रजी कॅलेंडर चा आहे. त्यामुळे, आजपासून नवीन वर्ष २०२३ चा प्रारंभ झाला, त्यानिमित्त नवं वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छ

कंत्राटी पोलीस भरती आणि परिणाम! 
अर्थमंदीची चाहूल !
समान संहितेची प्रयोगभूमी : उत्तराखंड !

साऱ्या जगावर प्रभाव आता इंग्रजी कॅलेंडर चा आहे. त्यामुळे, आजपासून नवीन वर्ष २०२३ चा प्रारंभ झाला, त्यानिमित्त नवं वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. अर्थात, वैचारिक मतभेद आणि वेगवेगळ्या विचार प्रवाहात आपण वावरत असलो तरी, नागरिक म्हणून आपण एकसंघ आहोत. विचारांना लढा विचारांनी द्यायला हवा ही आपली परंपरा आहे. याच परंपरेचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपताना शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ऐतिहासिक बाबीवर सांस्कृतिक पध्दतीने मांडले. त्यात त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक असं संबोधण्यात यावं, असे सांगतानाच त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जाऊ नये अशी ताकीदही त्यांनी सभागृहात दिली. त्यांच्या या वक्तव्याला धरून महाराष्ट्रात वैचारिक वितंडवाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय तोच मुळात चुकीचा आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे वक्तव्य संभाजी महाराज यांचा अपमान करणारे असल्याचे तुणतुणे वाजविले आहे. वास्तविक, छत्रपती संभाजी महाराज हे बहुभाषिक विद्वान होते. त्यांचे संस्कृतवर प्रभुत्त्व होते. शिवाजी महाराजांचा पहिला राज्यभिषेक ज्या पद्धतीने करण्यात आला होता, त्यावरून छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक करणाऱ्या पुरोहितांवर राग होता. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दुसरा राज्याभिषेक करण्याचा आग्रह धरला होता. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पुरोहितांना ही बाब रूचणारी नसल्याने त्यांचा संभाजी महाराजांना विरोध होता. परंतु, हा विरोध व्यक्त करण्यासाठी त्यांनी जे जे डावपेच केले ते छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करणारे होते, हे या महाराष्ट्रातील प्राच्यविद्या पंडितांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.

कवी असलेले पंडित निश्चलपुरी यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृतचे धडे घेतले होते. संस्कृतवर पुरोहित वर्ग वगळता अन्य कोणीही संस्कृत प्रभुत्व तर काय परंतु, साधे श्लोक ऐकले तरी शिसे ओतण्याची शिक्षा असलेल्या काळात असे साहस शक्यतोवर कोणी करित नसे. परंतु, छत्रपती संभाजी महाराज यांना राजकीयदृष्ट्या मुगलांविरूध्द आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुरोहितशाही विरूद्ध एकाचवेळी लढा द्यावा लागत होता. या सांस्कृतिक लढ्याचा भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ ला घडवून आणला. छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा घडवून आणलेला दुसरा राज्याभिषेकाचे पौरोहित्य त्यांचे संस्कृत गुरू कवी निश्चलपुरी यांनी केले होते. शाक्त पंथीय निश्चलपुरी यांच्यावरही त्यामुळेच पुरोहित वर्गाचा राग होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक हाच मुळात धर्मसत्तेला आव्हान देणारा असल्याने त्याचा अभ्यास अजित पवार यांनी केलेला आहे, असे त्यांच्या सभागृहात केलेल्या भाषणावरून म्हणता येईल. याचाच दुसरा अर्थ असा की, छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणे त्यांच्या ऐतिहासिक क्रांतिकारकत्वाला नाकारण्यासारखे होईल. छत्रपती संभाजी महाराज यांना ऐतिहासिक न्याय देताना हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल की, त्यांनी पुरोहितशाहीला नाकारले असून समतावादी शाक्त पंथाचा स्विकार केला आहे. त्यामुळे ते धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक आहेत, हे म्हणणे अधिक ऐतिहासिक आणि तथ्यपूर्ण व न्यायिक आहे. 

COMMENTS