Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सव्वाशेवर जागांसाठी तब्बल बारा हजारावर आले अर्ज

पोलिस भरती 2 जानेवारीपासून चाचणी

अहमदनगर प्रतिनिधी ः पोलिस भरतीच्या नगर जिल्ह्यातील 139 जागांसाठी तब्बल 12 हजार 334 अर्ज दाखल झाले आहेत. आता प्रत्यक्षातील मैदानी चाचणीला येत्या 2

ठोळे उद्योग समूहाची पुरग्रस्तांसाठी 51000/- रूपयांची मदत
फायनान्स कंपनीच्या विरोधात आज आझाद मैदानावर उपोषण
सुशीलामाई काळे महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन

अहमदनगर प्रतिनिधी ः पोलिस भरतीच्या नगर जिल्ह्यातील 139 जागांसाठी तब्बल 12 हजार 334 अर्ज दाखल झाले आहेत. आता प्रत्यक्षातील मैदानी चाचणीला येत्या 2 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 2 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी घेण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा पोललिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलिस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली 386 पोलिस अधिकारी-अंमलदारांचा बंदोबस्त भरती प्रक्रियेसाठी असणार आहे.

जिल्ह्यात 129 पोलिस शिपाईच्या जागेसाठी 11 हजार 188 तर चालकाच्या 10 जागांसाठी एक हजार 146 अर्ज दाखल झाले आहेत. एका जागेसाठी 88 उमेदवार स्पर्धेत आहे. गेल्या सहा ते सात वर्षानंतरची एवढ्या मोठ्या प्रमाणातील ही पहिलीच भरती असल्याने मुलांनी जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी मुलांच्या सरावांनी मैदाने गजबजली आहेत. जिल्हा पोलिसांकडूनही मैदानी चाचणीसाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे व तसे नियोजन करण्यात आले आहे.

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार्‍या चाचणीसाठी पहाटे पाच वाजता उमेदवारांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका दिवशी एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. सुरुवातील 2 व 3 जानेवारीला पोलिस चालक पदाच्या 10 जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर 4 ते 14 जानेवारीदरम्यान पोलिस शिपाई पदाच्या 129 जागांसाठी मैदानी चाचणी होणार आहे. पहाटे पाच ते सकाळी 11 वाजेपर्यंत दररोजचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मैदानी चाचणीवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. मैदानी चाचणी ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी लाचलुचपत विभागाचे पथकही असणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार पहाटे पाच वाजता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक 5, पोलिस निरीक्षक 20, सहाय्यक पोलिस निरीक्षक 11, पोलिस उपनिरीक्षक 26, पोलिस अंमलदार 236, महिला पोलिस अंमलदार 88 असा बंदोबस्त असणार आहे.

धावणे व गोळाफेक चाचणी – पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरतीची तयारी करण्यात आली आहे. सुरुवातीला कागदपत्रांची तपासणी, छाती व उंचीची मोजणी, नंतर गोळा फेक व 100 मीटर धावणे हे मैदानात होणार आहे. तर मुलींसाठी 800 मीटर व मुलांसाठी 1600 मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात व्यवस्था करण्यात आली आहे.

COMMENTS