Homeताज्या बातम्यादेश

केरळमध्ये पीएफआय संघटनेला दणका तब्बल 56 ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे

दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका

तिरुअनंतपूरम/वृत्तसंस्था ः केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधितांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयएने देशभर छापे टाकले होत

छ. संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
पहिल्या पत्नीस फसवून केले चक्क आणखी दोन विवाह..
पाच रुपयांचा मास्क पंधराला, तर दीड हजाराचा पलंग साडेसात हजाराला

तिरुअनंतपूरम/वृत्तसंस्था ः केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधितांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयएने देशभर छापे टाकले होते. त्यावेळी या संघटनेशी संबंधितांकडून दहशतवाद्यांना निधी पुरवण्यासाठी मोठी मदत होत असल्याचा आरोप करत या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. त्यानंतर गुरुवारी एनआयएने पुन्हा े केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित तब्बल 56 ठिकाणांवर छापे टाकले. एनआयएच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार पीएफआयचे नेते अन्य नावावर पीएफआय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएची छापेमारी पहाटे साडेचारपासून सुरू आहे. केरळच्या एर्नाकुलममध्ये पीएफआशी संबंधित आठ ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम येथे सहा जागांवर छापेमारी केली असून इतर अनेक ठिकाणांवर एनआयएची छापेमारी सुरू आहे.पीएफआय ही कट्टरतावादी विचारांची संघटना समजली होती. केरळ, कर्नाटकमध्ये या संघटनेचे मोठे कार्यक्षेत्र आहे. देशातील 24 राज्यांमध्ये या संघटनेच्या शाखा असून मुस्लिमबहुल भागात जनाधार मिळवण्याचा प्रयत्न या संघटनेकडून सुरू होता. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये त्यांचे काम सुरू होते. तर, पुणे हे पीएफआयचे मुख्य केंद्र आहे. दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात पाच वर्षांची बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर 22 आणि 27 सप्टेंबर रोजी छापे मारले आहेत. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे.

COMMENTS