अकरावीच्या सीईटीसाठी 19 जुलैपासून नोंदणी सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकरावीच्या सीईटीसाठी 19 जुलैपासून नोंदणी सुरू

पुणे/प्रतिनिधी : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना आता अकरावीच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत. अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परी

संभाव्य वादळीवारा व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी : तहसीलदार चंद्रे
आता कोणीही लॉकडाऊन अजिबात पाळणार नाहीत…
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

पुणे/प्रतिनिधी : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना आता अकरावीच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत. अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेतली जाणार असून, याची नोंदणी 19 जुलैपासून होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.
ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे तपशील, गुण भरावे लागतील आणि 170 रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. या प्रवेश परिक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍न विचारले जातील. 100 गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्‍न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल. या परिक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीईएसई अशा सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही अकरावीच्या जागा रिक्त राहात असल्याने प्रवेश मिळण्याबाबत समस्या येणार नाही, मात्र प्रवेशाच्या टक्के वारीमध्ये मोठी वाढ झाल्याने कला, वाणिज्य, विज्ञान, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS