महाविद्यालयांचे नवीन सत्र ऑक्टोबरपासून होणार सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविद्यालयांचे नवीन सत्र ऑक्टोबरपासून होणार सुरू

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे परीक्षांना विलंब झाला असून, नवीन शैक्षणिक सत्र लांबणीवर पडले आहे. मात्र 2021-22 च्या सत्रासाठी प्रथम वर्षाच्या विद्

रशियाकडून युक्रेनवर मोठ्या हल्ल्याची शक्यता
Gadhinglaj : अतिक्रमण कारवाई विरोधात ठिय्या आंदोलन | LOKNews24
स्पर्धेतूनच बहुआयामी व्यक्तीमत्व घडते ः डॉ. महेंद्र चितलांगे

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे परीक्षांना विलंब झाला असून, नवीन शैक्षणिक सत्र लांबणीवर पडले आहे. मात्र 2021-22 च्या सत्रासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी आणि उरलेल्या रिक्त जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. तसेच सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना 1 ऑक्टोबर रोजी नवे शैक्षणिक वर्ष सुरू करावेत अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने दिल्या आहेत. युजीसीचे सचिव, राजेश जैन यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोरोना संसर्गामुळे या वर्षीचं सत्र सुरू करण्यास उशीर झाला आहे आणि परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता आयोगाने सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना परिक्षांबद्दलचे निर्देश दिले आहेत. तसेच परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन किंवा मिक्स पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे यूजीसीने सांगितलं की 12वीच्या सर्व बोर्डांच्या परिक्षांचा निकाल 31 जुलैपर्यंत लागेल. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी. सत्र परीक्षा घेण्याचा किंवा सत्र संपल्यानंतर सुटी देण्याचा निर्णय त्या त्या शिक्षणसंस्थांचा राहील.
यूजीसीने दिलेल्या सुचनेनुसार, चालू शैक्षणिक सत्र 2020-21 साठी टर्मिनल सेमेस्टर किंवा अंतिम वर्षाची परीक्षा 31 ऑगस्ट 2021 नंतर ऑफलाईन (पेन आणि पेपर) ऑनलाइन किंवा मिश्रित (ऑनलाइन + ऑफलाइन) मोडमध्ये घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या नियम आणि मार्गदर्शक तत्वानुसार पार पडली पाहिजे. सीबीएसईच्या 12 वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल 31 जुलै 2021 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. जर 12 वीच्या निकालाच्या घोषणेस उशीर झाला तर विद्यापीठे व महाविद्यालये पुढील शैक्षणिक सत्र 18 ऑक्टोबर, 2021 पर्यंत सुरू करू शकतात. तोपर्यंत ऑनलाइन ,ऑफलाइन किंवा मिश्र पध्दतीनुसारमध्ये सुरू शिकवण्याची आणि शिकण्याची प्रक्रिया सूरू राहील, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS