Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

महापुरुषांच्या नावाने घोषणा देत अंगावर घेतले रॉकेल ओतून

नागपूर : नागपुरातील विधिमंडळाच्या परिसराच्या बाहेर एका महिलेने शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांचा अपमान करणार्‍यांना कडक शिक्ष

टू-व्हीलर ब्रँड लॅम्ब्रेटा 2023 मध्ये भारतात पुनरागमन करणार आहे.
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आमदार अपात्रतेच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ

नागपूर : नागपुरातील विधिमंडळाच्या परिसराच्या बाहेर एका महिलेने शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांचा अपमान करणार्‍यांना कडक शिक्षा व्हावी म्हणून कायदा करावा, यासाठी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. महिलेच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
नागपूरच्या विधिमंडळ परिसरात टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांचा अपमान करणार्‍यांना कडक शिक्षा व्हावी म्हणून कायदा करावा, यासाठी महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी दुपारी 2:35 वाजण्याचा सुमारास कविता चव्हाण यांनी रॉकेल ओतले आहे.

यावेळी कविता चव्हाण यांनी ’शिवाजी महाराज की जय’ या आशयाच्या घोषणा देखील दिल्या. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. संतांचा अपमान झाल्यामुळे यावर सरकार काही कारवाई करत नाही. यामुळे महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करता, वारकरी संप्रदायाचा अपमान करता, तुमच्या अधिवेशनात पोलिसांना जेवण मिळत नाही, तुमच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक नाही, शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, अशा घोषणा देत अचानकच या महिलेने विधानभवनाच्या मुख्य दारासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतले. तिथल्या सुरक्षारक्षकांनी तिला वेळीच थांबवले आणि पुढील अनर्थ टळले. सध्या नागपूर पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले असून तिला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. महिला सोलापूर येथील असून तिचे नाव कविता चव्हाण असल्याची माहिती आहे.

राज्यभरात महापुरुषांचे अपमान करण्याची स्पर्धाच सुरु असून यावर राज्य सरकार बोलायला तयार नसल्याचे आरोप करत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. तसेच दररोज राज्यपाल हटाओ, महाराष्ट्र बचाओ आदी घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला होता.दरम्यान, कविता चव्हाण या टायगर ग्रुपच्या सोलापूर शहराध्यक्ष आहेत. प्रत्येक अधिवेशनादरम्यान त्या अशा प्रकारच्या आंदोलन करून स्वत: कडे प्रशासनाचे व प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधतात. 2019 साली त्यांनी पोलिसांच्या प्रश्‍नांसाठी त्यांनी अशा प्रकारच्या आंदोलन विधानभवनाच्या गेटवर देखील केले होते.

COMMENTS