बसपचा आक्रोश मोर्चा आज  नागपूरच्या विधानभवनावर धडकणार   

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बसपचा आक्रोश मोर्चा आज  नागपूरच्या विधानभवनावर धडकणार  

बुलढाणा प्रतिनिधी-  बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज शुक्रवारी, २३ डिसेंबर रोजी नागपूरमधील विधान भवनावर आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. यासाठी बुल

किरण माने कधीही चुकीचे वागले नाही, त्यांनी मुलीप्रमाणं वागणूक दिली : श्वेता आंबीकर | LOKNews24
पत्रकार बाळ बोठेला हायकोर्टाचा दणका ; जामीन अर्ज फेटाळला | DAINIK LOKMNTHAN
कॉंग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आल्यास झोडून काढू | LOKNews24

बुलढाणा प्रतिनिधी–  बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज शुक्रवारी, २३ डिसेंबर रोजी नागपूरमधील विधान भवनावर आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातून पक्षाचे शेकडो कार्यकर्ते गुरुवारी रात्री रवाना झाले आहेत.भूमिहीन गायरान अतिक्रमित जमीनधारक शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवा बेरोजगार शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा माेर्चा असणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, १-२ गुंठेवारी खरेदी-विक्री सुरू करावी, अशा विविध २६ मागण्या केल्या असून त्याचे निवेदन सरकारला देण्यात येणार आहे. या आक्रोश मोर्चाला सुमारे एक लाख कार्यकर्ते येण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

COMMENTS