जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन होऊन वर्ष झालं पण नागरिकांना पाहावी लागते पाण्यासाठी वाट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन होऊन वर्ष झालं पण नागरिकांना पाहावी लागते पाण्यासाठी वाट

जळगाव प्रतिनिधी - चोपडा शहराचे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जुने जलशुद्धीकरण केंद्र ची क्षमता वाढलेले शहरातील लोकसंख्ये नुसार नागरिकांना पाण

खा. शरद पवार मुख्ममंत्री असतांना घेतली होती दाऊदची भेट : अ‍ॅड. आंबेडकर
अमरावतीत रवी राणा विरोधात बच्चू कडू आपली भूमिका मांडणार
भाजपमय जिल्ह्याला…नऊ आमदारांची आडकाठी

जळगाव प्रतिनिधी – चोपडा शहराचे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जुने जलशुद्धीकरण केंद्र ची क्षमता वाढलेले शहरातील लोकसंख्ये नुसार नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची क्षमता नसल्याने नवीन जल शुद्धीकरण केंद्र व शहरातील 90 किलोमीटरची नवीन पाईपलाईन जलकुंभ व गुळ प्रकल्प  आणि कटोरा गावातील तापी नदीवरून पाईप लाईन जलशुद्धीकरण पर्यंत पाईपलाईन करण्यासंदर्भात 64. 76 कोटीची योजना मंजूर झाली आणि त्या योजनेचे भूमिपूजन तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते सन 2018 मध्ये मोठ्या जल्लोष त करण्यात आले या योजनेचे पूर्ण करण्याचं कालावधी 18 महिन्याची असली तरी या कामासाठी दोन वेळा मुदतवाढ घेण्यात आली आणि नगर परिषदेमध्ये सत्ता असलेल्या शहर विकास मंचची कार्यकाळ 29 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण होत असल्याने पुढे प्रशासक बसेल म्हणून वीस डिसेंबर 2021 रोजी तत्कालीन महाविकास आघाडी  सरकार मधले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे  माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती माजी आमदार कैलास पाटील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील हे देखील उपस्थित होते यावेळी पाणीपुरवठा जलशुद्धीकरण या योजनेचे काम 65 टक्के झालेले होते वीस डिसेंबर २०२२ उलटून गेलं तरी देखील चोपडा शहरातील नागरिकांना दहा दिवसानंतर पाणीपुरवठाची वाट पहावी लागते आणि ते देखील नियोजन नसल्याने वेळेवर सोडले जात नाही  चोपडा शहरात जर मोटर सायकलने फेरफटका मारला तर पाण्यासाठी प्रत्येकाचा घराबाहेर पाण्याच्या स्टॉक  करण्यासाठी टाक्याच टाक्या दिसतील  यावरून आपल्या लक्षात येईल की चोपडा शहरातील पाणीपुरवठा नागरिकांना किती दिवसानंतर होत असेल आणि त्याचा त्रास महिलांना किती सहन करावा लागत असेल . पाणीपुरवठा योजनेचे कामकाज पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल या संदर्भात या योजनेचे काम  घेतलेले तेजस कंट्रक्शन चे मॅनेजर मनोज शिंदे यांच्याशी याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले चोपडा शहरातील 90 किलोमीटरची पाईपलाईन टाकून झालेली आहे.

  गुळ प्रकल्प  येथून पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे कटोरा गावातून नागरिकांचा पाईपलाईन टाकण्यासंदर्भात विरोध असल्याने त्याला वेळ लागला परंतु आताचे मुख्याधिकारी यांनी गावकऱ्यांशी समन्वय साधून मार्ग मोकळा केला आहे गावात व्हाॅल बसवण्याचं काम बाकी आहे परंतु नागरिकांनी नवीन पाईपलाईन वरून फक्त  दोन हजार कनेक्शन घेतले आहे नवीन जलशुद्धी केंद्रावरून नवीन जल  कुंभात पाणी  भरून टेस्टिंग करण्यात व त्या पाण्याचे नमुने टेस्टिंग करण्यासाठी जळगाव धुळे येथे पाठवण्यात येईल आपल्याला वाटलं   योग्य प्रमाणात पाणी फिल्टर होत असल्याचा वाटलं तर नागरिकांना या जलशुद्धीकरणावरून पाणीपुरवठा देता येईल याला काही दिवस अजून वाट पहावी लागेल असे तेजस कंट्रक्शन चे मॅनेजर मनोज शिंदे यांनी सांगितले. शहरातील नागरिकांना चोपडा नगर परिषदेकडून बारा ही महिना दहा-बारा दिवसानंतर पाणी येत असल्याने शहरातील महिलांना पिण्याच्या पाणी  सोबत वापरण्यासाठी टाक्या भरून ठेवावे लागतं  त्याचबरोबर पाणी कधी आणि केव्हा सोडायचे याबद्दल नियोजन शून्य असल्याने महिला शेतमजूर शेतात कामाला जर गेलं  त्यानंतर पाणी सोडले जात त्यामुळे पाणी भरले जात नाही कधी सकाळी तर कधी दुपारी कधी ज्या दिवशी पाण्याच्या वार असतो  त्याच्या आधी सोडले जातं तर कधी त्याच्या नंतर सोडतात कुठलाही एका टायमाला व दोन ते तीन दिवसात पाणी सोडलं गेलं पाहिजे अशी मागणी शहरातील महिला वर्गांनी केलेली आहे आणि अवेळी पाणी सोडत असल्याने याच्यावर देखील नाराजी व्यक्त केले आहे. कार्यकाळ संपण्याच्या आधी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून घेतले लोकांना असं दाखवण्याचे प्रयत्न केले की आम्ही चोपड्यासाठी काहीतरी मोठे कार्य केले आहे उद्घाटन करून देखील नागरिकांना आठ आठ दहा दिवस पाणी मिळत नाही याचा परिणाम येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये जनता यांना दाखविल्याशिवाय राहणार नाही लोकांमध्ये यांच्याबद्दल रोष निर्माण झालेला आहे जनता ही बोलून दाखवत नाही जनता आपला संताप मतपेटीतून व्यक्त करून दाखवते यांना निश्चित शंभर टक्के फटका बसणार आहे असे शिंदे गटाचे शहराध्यक्ष आबा देशमुख यांनी सांगितले. 

COMMENTS