Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री फडणवीस असतील- बावनकुळे

नागपूर/प्रतिनिधी ः देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांच्याकडे जो-जो समाज गेला, त्यांना न्याय देण्याचे काम फडणवीसांनी केले आहे. त्यामुळे आता फडणवी

हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला सोयी-सुविधा द्या
पत्रकार सोमनाथ कचरे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड
प्रेयसीसाठी 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोळीबार.

नागपूर/प्रतिनिधी ः देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांच्याकडे जो-जो समाज गेला, त्यांना न्याय देण्याचे काम फडणवीसांनी केले आहे. त्यामुळे आता फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असताना ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाले पाहिजे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर आता बावनकुळेंनी फडणवीसांनाच मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा केल्याने भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. नागपुरातील संत संताजी जगनाडे महाराज यांचे स्मारक आणि आर्ट गॅलरीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोणत्याही समाजाला न्याय देण्याचा प्रश्‍न आला तेव्हा फडणवीसांनी पुढाकार घेत अनेक समाजघटकांच्या मागण्या मान्य केल्या. परंतु त्यांनी आपल्याकडून कधीही, कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नाही. त्यामुळे आता त्यांना पदावर बसवण्यासाठी नाही तर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील 18 पगड जातीच ओबीसी आरक्षण गेले होते, ते परत मिळवून देण्याचा काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिले. संताजी सभागृहाला जागा देणं निधी देणं, संताजी महराजांचा संपूर्ण इतिहास मांडला जाईल, त्यातून समाजाला दिशा मिळेल. साडेतीन हजार कोटी रुपये महविकास आघाडी सरकारने थांबवले होते, तो निधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देत महविकास आघाडीने केलेला अन्याय दूर केला, असा दावा बावनकुळेंनी केला.

COMMENTS