पुणे/प्रतिनिधी ः ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या आणि शिंदे गट आणि भाजपला जेरीस आणणार्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायची माफी मागून देखील या वाद
पुणे/प्रतिनिधी ः ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या आणि शिंदे गट आणि भाजपला जेरीस आणणार्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायची माफी मागून देखील या वादावर पडदा पडण्याची शक्यता नाही. कारण विश्व वारकरी संघ आणि महानुभाव पंथाने आक्रमक पवित्रा घेतला असून, विश्व वारकरी संघ राज्यभर गुन्हे दाखल करणार असल्याचे विश्व वारकरी संघाने सुरु केल्याचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी जाहीर केले आहे.
वारकरी संतांच्याबाबत वक्तव्यानंतर काल सुषमा अंधारे यांनी माफी मागितली असली तरी यावर वारकरी संप्रदायाचे समाधान झालेले नसून त्यांचे विरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व वारकरी संघाच्या तुकाराम चौरे महाराज यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णा विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महानुभाव संप्रदायात देखील संतापाची लाट असून अंधारे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ भगवान श्रीकृष्णासमोर घेण्याची मोहीम गावोगावी राबवली जाणार आहे. याची सुरुवात औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमातून झाली आहे. वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्ये केली तर त्याची किंमत त्यांना भोगावी लागेल असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला आहे. राज्यातील 36 जिल्हे आणि 270 तालुक्यात पसरलेल्या या संघटनेने आपल्या गावोगावच्या पदाधिकार्यांना सुषमा अंधारे यांच्या विरोधात तक्रार देण्याच्या सूचना दिल्याचे जगन्नाथ महाराज देशमुख यांनी सांगितले.
COMMENTS