Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोजडे येथील मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा कौतुकास्पद – विवेक कोल्हेे

कोपरगाव प्रतिनिधी - लग्न समारंभावर होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देत एकाच मांडवात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून कोपरगाव तालुक्यातील भोजडे

ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य सचिवपदी राजेंद्र वाघमारे
नाशिक शिक्षक मतदार संघ 93.48 टक्के ; कोपरगाव तालुक्यात 93.58 टक्के मतदान
 पोलिस मित्र मदत केंद्र महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अहमदगर जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानेशवर येवले

कोपरगाव प्रतिनिधी – लग्न समारंभावर होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देत एकाच मांडवात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाने आदर्श पायंडा पाडला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद व आदर्शवत आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.


कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा सामुदायिक विवाह सोहळा आज सोमवारी (12 डिसेंबर) धार्मिक रिती-रिवाजाप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडला. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल भोजडे येथील मुस्लिम समाजबांधवांचे अभिनंदन केले. या विवाह सोहळ्यात 12 जोडपे विवाहबद्ध झाले. याप्रसंगी या विवाह सोहळ्याचे संयोजक बाबा शेख, सलीम शेख, सदरु शेख, सलीम मुसा शेख,शेहरू शेख, मोहसीन सय्यद, बद्रुद्दीन शेख, सिकंदर शेख, इब्राहिम शेख, गुलाब शेख, जावेद शेख, कय्यूम शेख, सलीम शेख, बाबा कालू, जाफर मकबूल, अकबर करीम, इब्राहिम भाई, हसन भाई, ज्ञानेश्‍वर सिनगर, संजय सिनगर, कैलास धट, रंगनाथ सिनगर, शामराव गिरे, बाळासाहेब सिनगर, पवन सिनगर, नानासाहेब सिनगर, वाल्मिक बोर्‍हाडे, रवींद्र मंचरे, विकास बोर्डे, संतोष बोर्डे, बाबासाहेब बोर्डे, सतीश शेटे, श्रावण बोर्डे, अशोक सिनगर, दीपक मंचरे, प्रमोद सिनगर, सचिन सिनगर, सचिन घनघाव, बाबासाहेब सोनवणे, बाजीराव सिनगर आदींसह मुस्लिम समाजबांधव तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या परिसरातील हिंदू आणि मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. धार्मिक रिती-रिवाजाप्रमाणे मोठ्या हर्षोल्हासात हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS