Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करावा

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश भगवान पंडित यांचे प्रतिपादन

कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगावच्या के.बी. पी. विद्यालयात शनिवारी 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त निमित्त कोपरगाव तालुका विधी

मंजूर गावातून लाख रुपयेचा गांजा जप्त
VIRAL BREAKING : इस डॉक्टर ने तो रुला दिया, किसी की तो सुन लो मोदी जी… | पहा Lok News24
अहमदनगर बारच्या अध्यक्षपदासाठी; तिरंगी तर उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढत

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगावच्या के.बी. पी. विद्यालयात शनिवारी 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त निमित्त कोपरगाव तालुका विधी प्राधिकरण समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवाद  अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अतिरिक्त सत्र न्यायाधीश भगवान पंडित, कोपरगाव बार असोसिएशनचे जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. गंगावणे बी एन, अ‍ॅड. शितल देशमुख तसेच शाळा समितीचे पद्माकांत कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.


  या प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख उपस्थितीत असलेले न्यायाधीश पंडित यांनी बोलताना सांगितले की, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला तरी कायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकला नाही .म्हणून कायदे, हक्क ,जबाबदार्‍या याची माहिती देऊन प्रत्येक नागरिकास कायदा साक्षर बनवणे हाच प्रमुख उद्देश आजच्या कार्यक्रमाचा असल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन त्याचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या व पर्यायाने समाजा साठी करणे हाच खरा मानवी हक्क असल्याचे सांगत सर्वाना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील यांनी बोलताना सांगितले की, प्रत्येकाने एकदा तरी रयत शिक्षण संस्थेतील ’कमवा व शिका’ योजना जगली पाहिजे . तसेच रयत मधील विद्यार्थ्यांवर असलेला संस्कार फक्त रयत मध्येच असल्यामुळे, रयत शिक्षण संस्था ही सर्वश्रेष्ठ संस्था असल्याचे प्रतिपादन करत आजचे  90% गुन्हे हे मोबाईल मुळे घडत असल्याचे  सांगत मोबाईलचा आवश्यक त्या महत्वाचा गोष्टी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगून पालकांनी आपल्या पाल्याकडे वाहन देऊ नये अशी विनंती पालकांना  करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपली गरिबी तसेच इंग्रजी भाषा याविषयी न्यूनगंड न बाळगता विषय समजून घेत इंग्रजी भाषेचे अनुकरण करणे काळाची गरज असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कातकडे यांनी करत संविधानाचे वाचन केले यामध्ये सर्व अतिथी, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. या  कार्यक्रमाचे आभार विद्यालयातील गुरुकुल विभागाचे प्रमुख काशिनाथ लव्हाटे तर  सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले.  या प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका मंगला राजेभोसले, पर्यवेक्षिका काशीबाई जगताप, गुणवत्ता विभागाचे शहाजी सातव तसेच किरण बोळीज, मंगलदास बत्तीसे, अरुण पोळ, चैतन्य ढगे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS