मुंबई : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यामुळे तब्बल 13 महिन
मुंबई : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यामुळे तब्बल 13 महिन्यांनंतर देशमुख तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. मात्र आठवड्यातून दोन दिवस सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. यासाठी 10 दिवसांची स्थगिती या निर्णयावर द्यावी, अशी मागणी सीबीआयने केली. न्यायालयाने सीबीआयची बाजू ऐकून घेत या निर्णयाला स्थगिती दिली आहे. जामीन मंजूर झाला असला तरी देशमुख यांना तुरुंगातून मुक्त केले जाणार नाही. देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सीबीआयच्या मागणीनुसार जामीन मंजूर झाल्याच्या निर्णयाला 10 दिवसांची स्थगिती निर्णयाला देण्यात आली असली, तरी सर्वोच्च न्यायालयामध्येही उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहील, असा विश्वास आम्हाला आहे. अनिल देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुखांना उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना देशमुखांचे पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे, पुढील तपासात सहकार्य करणे अशा अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे पुढचे 10 दिवस अनिल देशमुख यांना तुरुंंगातच राहावे लागणार आहे.
COMMENTS