Homeताज्या बातम्यादेश

तपासात दिरंगाई करणार्‍यांवर होणार कारवाई

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात कारवाईचे निर्देश

नवी दिल्ली प्रतिनिधी - संपूर्ण देशभर खळबळ उडवून देणार्‍या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात तपासात दिरंगाई करणारे अधिकार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार

धूळमुक्त बाजारपेठेसाठी नगरमध्ये सह्यांची मोहीम
अधिकारवाणीने आपली कामे सांगा ः खा. निलेश लंके
उमरखेड तालुक्यात अज्ञातांनी एसटी बस पेटवली

नवी दिल्ली प्रतिनिधी – संपूर्ण देशभर खळबळ उडवून देणार्‍या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात तपासात दिरंगाई करणारे अधिकार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार होती. मात्र आता या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी काढला आहे. हत्येच्या थरारक घटनेनंतर तपासात आणि चौकशीत बेजबाबदारपणा दाखवत दिरंगाई करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे.


 मुंबईतील तुलिंज आणि मानिकपूर ठाण्यातील पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. आरोपी आफताबने मारहाण केल्यानंतर श्रद्धा वालकरनं मुंबईतील तुलिंज आणि मानिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळेच पुढील संतापजनक प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. हा मुद्दा श्रद्दाचे वडील विकास वालकर यांनी उपस्थित करत पोलिसांच्या चौकशीवर गंभीर प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यानंतर आता या प्रकरणातील जबाबदार पोलीस अधिकार्‍यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. आफताबने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर श्रद्धाने मुंबईतील तुलिंज पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु त्यावेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आरोपी आफताबच्या आई-वडिलांनी विनंती केल्यामुळे श्रद्धाने तक्रार अर्ज मागे घेतला होता. याशिवाय श्रद्धा बेपत्ता झाल्यानंतर विकास वालकर यांनी मानिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या अर्जाची कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकाराला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS