Homeताज्या बातम्यासंपादकीय

मंदीचे सावट गडद

जागतिक महामंदीचे मळभ संपूर्ण जगतावर गडद होतांना दिसून येत आहे. विविध देशांनी ही परिस्थिती आपणहून ओढवून घेतल्याचे एंकदरित दिसून येते. कोरोनाच्या द

तलाठी परीक्षेतील नवा घोळ
वादळापूर्वीची शांतता
गोवरचा विळखा

जागतिक महामंदीचे मळभ संपूर्ण जगतावर गडद होतांना दिसून येत आहे. विविध देशांनी ही परिस्थिती आपणहून ओढवून घेतल्याचे एंकदरित दिसून येते. कोरोनाच्या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीनंतर मानव प्राणी थोडा प्रगल्भ होईल, आणि यापासून काही धडा घेईल, असे वाटत होते. पण मानवाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नाही, हेच आजच्या जागतिक परिस्थितीतून दिसून येते. रशिया-युक्रेन युद्ध, लंकेची झालेली वाताहत, पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला पोहचलेली आहे, त्यातच ब्रिटनमध्ये आर्थिक संकट घोघावतेय, अमेरिकेमध्ये देखील यादवीची चाहूल दिसून येत आहे. एकाच वेळी विविध देशात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता आणि शेजारी देशांवर आपली हुकूमत असावी, अशी महत्वाकांक्षा अर्थव्यवस्थेचा घात करतांना दिसून येत आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला अजून जरी आर्थिक घडामोठींचा मोठा फटका बसला तरी, देशात महागाईचा दर वाढत चालला आहे. नुकतेच रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये 0.35 टक्क्यांची वाढ केलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा गृह-वाहन कर्जे महाग होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हा मोठा भुर्दंड वाढत चालला आहे. मंदीचे संकट घोंघावण्यामागे अनेक बाबी कारणीभूत असून, युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याचा पुरवठा कमी झाला आहे. इतकेच नाही तर, पुरवठा साखळीवरील साथीच्या रोगाचा परिणाम, चीनमधील कोरोना लॉकडाऊनमुळे कमी मागणी आणि कृषी क्षेत्राचा अंदाज चुकवणारे अत्यंत खराब हवामान यासारख्या कारणांमुळे जगाला विक्रमी महागाईचा सामना करावा लागत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरमध्ये पाचव्यांदा रेपो रेट 0.35 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्के झाला आहे. त्यामुळे वाहन, घरांचे हफ्ते वाढतांना दिसून येत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची कपात करतांना दिसून येत आहे. अ‍ॅमेझॉन, ट्विटर, यासारख्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक मंदचे संकट गडद होतांना दिसून येत आहे. ब्रिटनमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तिथेही लगेच परिस्थिती बदलेल असे चित्र नाही. सुनक यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. तरी देखील अर्थव्यवस्था रुळावर येण्याच बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. युरोपात आर्थिक संकटामुळे मंदीचे वारे वाहते आहे. त्याचा आपल्या निर्यातीवर वाईट परिणाम होत आहे. गेल्या दोन महिन्यात निर्यातीत सातत्याने घट होत आहे. आता आंतरराष्ट्रीय स्थितीचा आपल्यावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी आर्थिक धोरण बदलत एकाच वेळी व्याजदर वाढवल्यामुळे, सन 2023 मध्ये जग जागतिक मंदीच्या दिशेने जाऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. जागतिक बँकेने एका नवीन अभ्यासात म्हटले आहे की, जगभरातील मध्यवर्ती बँका या वर्षी व्याजदर वाढवत आहेत, जे गेल्या पाच दशकात दिसले नाही. मात्र, पुढील वर्षी याचे परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले की, महागाई कमी करण्यासाठी उत्पादन वाढवणे आणि पुरवठ्यातील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. जग जागतिक मंदीच्या दिशेने जाऊ लागले आहे, याची काही संकेत मिळणे आधीच सुरु झाले आहे. 1970 नंतरच्या मंदीनंतरच्या रिकव्हरीनंतर जागतिक अर्थव्यवस्था आता सर्वात जास्त मंदीच्या गर्तेत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. जागतिक बँकेच्या नव्या अहवालात असे म्हटले गेले आहे की, केवळ व्याजदर वाढवणे हा उपाय पुरेशा प्रमाणात पुरवठा अडथळ्यांमुळे निर्माण होणारा चलनवाढ फुगवटा कमी करण्यासाठी पुरेसा नाही. तर, देशांनी वस्तूंची उपलब्धता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच याचे परिणाम कमी होऊ शकतील.

COMMENTS