कोरोनामुळे प्रवाशी वाहनांच्या निर्यातीत घट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनामुळे प्रवाशी वाहनांच्या निर्यातीत घट

कोरोना साथीच्या आजाराचा देशाच्या वाहन उद्योगावरही परिणाम झाला आहे. 2020-21 मध्ये देशातून प्रवासी वाहनांची निर्यात 39 टक्क्यांनी कमी झाली.

खास एफसी या ५ बटाटा वाणाचे पेटंट रद्द | LOKNews24
जिल्हा रुग्णालयात  थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल अनेमिया  रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन-डॉ.साबळे
चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा गेली गटारात .

मुंबई / प्रतिनिधीः कोरोना साथीच्या आजाराचा देशाच्या वाहन उद्योगावरही परिणाम झाला आहे. 2020-21 मध्ये देशातून प्रवासी वाहनांची निर्यात 39 टक्क्यांनी कमी झाली. कोरोनामुळे, भारतातून इतर देशांमध्ये माल पोहोचवण्यात अडचण येत आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या मते, निर्यातीत सर्वात मोठी घट यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत झाली आहे. या संस्थेच्या आकडेवारीनुसार 2020-21 मध्ये प्रवासी वाहनांची निर्यात 38.92 टक्क्यांनी कमी होऊन चार लाख चार हजार चारशेवर वाहनांवर आली आहे. 2019-20 मध्ये सहा लाख 62 हजार 118 वाहनांची निर्यात झाली होती.

2020-21 मध्ये पॅसेंजर कारची निर्यात 44.32 टक्के कमी होऊन दोन लाख 64 हजार 927 युनिट्स शिल्लक आहेत. 2019-20 मध्ये चार लाख 75 हजार 801 वाहनांची निर्यात झाली होती. युटिलिटी वाहनांविषयी बोलायचे झाले तर त्यांच्या निर्यातीमध्ये 24.88 टक्क्यांनी घट झाली आहे. 2020-21 मध्ये चार लाख 75 हजार 801 वाहनांची निर्यात झाली होती. 2019-20 मध्ये दोन हजार 849 व्हॅनची निर्यात झाली होती, जी 2020-21 मध्ये कमी होऊन एक हजार 648 वर आली आहे. म्हणजेच यात 42.16 टक्क्यांची घट झाली आहे. दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल उत्पादक ह्युंदा़ई मोटर इंडिया 2020-21 मध्ये प्रवासी वाहनांच्या निर्यातीच्या बाबतीत पहिल्या स्थानावर राहिली. कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण एक लाख चार हजार 342 प्रवासी वाहने विविध देशांमध्ये पाठवली. 2019-20 च्या तुलनेत हा आकडा 38.57 टक्के कमी आहे. दुसरीकडे, सुझुकी मारुती दुसर्‍या क्रमांकावर आहे. मारुती सुझुकी इंडियाने यंदा 94 हजार 938 युनिट्सची निर्यात केली, जी एका वर्षाच्या तुलनेत 5.34 टक्के कमी आहे. 2020-21 मध्ये भारतातील प्रवासी वाहनांच्या विक्रीतही दोेन टक्के घट झाली आहे. वाहन निर्यातदार संघटनेने सांगितले, की कोविड महामारीमुळे या उद्योगाला मोठे नुकसान झाले. आकडेवारीनुसार, 2020-21 या वर्षात प्रवासी वाहनांची विक्री 2.24 टक्कयांनी घसरून 27 लाख 11 हजार 457 युनिट्सवर आली आहे, जी याच्या एक वर्षापूर्वी 27 लाख 73 हजार 519 युनिट्स होती.

COMMENTS