Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंदिरात चोरीप्रकरणी अज्ञात विरोधार्थ गुन्हा दाखल

सातारा / प्रतिनिधी : बिरवाडी, ता. महाबळेश्‍वर येथील कालभैरव मंदिरात चोरी झाली असून सुमारे 30 हजाराची चोरी झाली आहे. अज्ञात चोराविरोधात गुन्हा द

दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करून पाच तोळे सोने लंपास
वीज यंत्रणेवरील स्थानिक कर आकारणीतून महावितरणला सूट
दुचाकी-ट्रक धडकेत युवक जागीच ठार; एक जखमी

सातारा / प्रतिनिधी : बिरवाडी, ता. महाबळेश्‍वर येथील कालभैरव मंदिरात चोरी झाली असून सुमारे 30 हजाराची चोरी झाली आहे. अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेली 35 वर्षे पुजारी म्हणून काम हरी नारायण जंगम करत आहेत. त्यांनी पोलीस ठाण्यात हजर राहुन खबरी जबाब असा दिला आहे. मी, माझी पत्नी सौ. राजेश्री, दोन मुले विक्रम व शुभम असे एकत्रीत राहणेस आहे. मंदीर हे दिवसभर भाविकांसाठी-दर्शनासाठी खुले असते. मंदिर रात्री 8 वा. लोखंडी जाळीचा दरवाजा सरकावून बंद करतो. मंदीरात एक दानपेटी ठेवलेली असून ती दानपेटी आम्ही वर्षातून एकदा यात्रेला उघडत असतो. दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 च्या सुमारास मंदिर उघडून पुजाअर्चा करुन 10 वा. घरी गेलो. पुन्हा सायंकाळी 6 वाजता येवून पुन्हा मंदीरातील पूजाअर्चा केली. रात्री 8 च्या सुमारास घरी गेलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी मंदिरात असलेले कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. दानपेटी उघडून बाजूला सरकवलेली दिसली. या प्रकाराबाबत गावातील लोकांना सांगीतले. त्यानंतर गावातील लोक मंदीरात आल्यावर आम्ही दानपेटीमधील रक्कमेची पाहणी केली असता चलनी नोटा चोरीस गेल्याचे आमचे लक्षात आले. त्यानंतर आम्ही दानपेटीतील शिल्लकरक्कम 214 रुपये होती. अज्ञात चोरट्याने दानपेटीतील रोकड लंपास केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंदाजे 30 हजार रुपयाचाी रोकड असल्याची शक्यता आहे.

COMMENTS