अहमदनगर प्रतिनिधी - भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस बुधवारी रात्री बाहेर पडली. प

अहमदनगर प्रतिनिधी – भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस बुधवारी रात्री बाहेर पडली. पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षातच दोघांमध्ये चांगलाच राडा झाला. ही घटना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली आहे. हप्तेखोरीतून हा प्रकार झाल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.
भिंगार शहर तसेच नगर तालुक्यातील बुर्हाणनगर, दरेवाडी आदी भागाची जबाबदारी असलेले भिंगार कॅम्प पोलिस ठाणे नेहमीच चर्चेत असते. हद्दीत अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. पोलिस ठाणे हद्दीतील हप्तेखोरीही चर्चेचा विषय आहे. याच कारणातून पोलिस अंमलदारांमध्ये नेहमी एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू असते. पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांच्या मर्जीतील एका अंमलदारावर अनेकांचा डोळा आहे. त्याची हप्तेखोरी उघड करण्यासाठीचा प्रयत्न इतरांकडून सुरू आहे. त्या अंमलदाराला इतरांकडून टार्गेट केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. याला बुधवारी रात्री वेगळे वळण मिळाले. पोलिस ठाणे हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्याच्या सूचना प्रभारी अधिकार्यांनी दिल्या. या पथकामध्ये जाणार्या प्रभारी अधिकार्यांच्या मर्जीतील अंमलदाराला दुसर्या एका अंमलदाराकडून अश्लिल भाषेचा वापर झाला. यातून हा वाद झाला. ते दोघे एकमेकांवर भिडले. तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी व अंमलदारांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेर्यात ही घटना कैद झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन अंमलदारांमधील खदखद हाणामारीतून बाहेर आल्याने याची चर्चा सर्वत्र आहे.
पोलिस ठाण्यातील या प्रकाराची दखल पोलिस ठाणे प्रभारी अधिकार्यांनी घेतली आहे. घटना घडली त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून स्टेशन डायरीमध्ये नोंद केली आहे. हा प्रकार कशातून घडला याची चौकशी सुरू केली असून चौकशीअंती अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या दोघांच्या वादाला तिसर्या एका अंमलदाराकडून फोडणी दिली जात आहे. तो अंमलदार दोघांच्या वादाची वाचता पोलिस दलात करीत आहेत. त्याच्यावरही वरिष्ठ अधिकार्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
COMMENTS