Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन नाहीच

मुंबई प्रतिनिधी - मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या काही महिन्यापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामीन मि

अनिल देशमुखांना जामीन मंजूर
तडजोडीस नकार दिल्यानंतर मला ईडीकडून अटक
खोटी प्रतिज्ञापत्रे घेवून येणारा तो एनडीएचा पदाधिकारी

मुंबई प्रतिनिधी – मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या काही महिन्यापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे. मात्र त्यांना मंगळवारी देखील जामीन मिळालेला नाही. त्यांच्या जामीनावरील मंगळवारची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे देशमुखांचा आजही जामीन मिळू शकला नाही.
उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत सुनावणी शुक्रवार, 2 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. सीबीआयकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. अनिल सिंह प्रकृती अस्वस्थ्यामुळे आज उपस्थित राहू शकले नाहीत. एका अर्जाद्वारे त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. सुनावणी पुढे ढकलण्यास अनिल देशमुखांच्या वकिलांनी तीव्र विरोध केला. तपास यंत्रणा केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप देशमुखांच्या वतीने करण्यात आला. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात देशमुखांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. मात्र, याच प्रकरणाशी संबंधित ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानं सीबीआयने प्रकरणात जामीन न देणे चुकीचे असल्याचा दावा देशमुखांकडून करण्यात आला आहे.

COMMENTS