सीमावाद प्रश्‍न चिघळणार  !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमावाद प्रश्‍न चिघळणार  !

सोलापूर अन् अक्कलकोटही घेणार - कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे वक्तव्य

मुंबई/बंगळुरु - महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जावू देणार नसून, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्‍न सामौपचाराने मिटवू अशी भूमिका मुख्यमंत्री एक

अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार !
अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला परिवहन विभागाचा आढावा

मुंबई/बंगळुरु – महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जावू देणार नसून, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्‍न सामौपचाराने मिटवू अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यानंतर गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत, सोलापूर आणि अक्कलकोटही घेऊ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याचे संकेत दिसून येत आहे.
बोम्मई यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्‍नावर चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आमच्या राज्याची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावे कर्नाटकात येऊ इच्छितात. त्यांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत.  त्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. महाराष्ट्रातले एकही गाव कर्नाटकला देणार नाही. सर्वोच्च न्यायालयात बेळगाव, कारवार, निपाणीसह कर्नाटकात गेलेली इतर गावही महाराष्ट्रात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. 2012 मध्ये त्या गावांनी हा ठराव केला होता. पण सध्या असा काही नवीन ठराव झालेला नाही, असेही फडणवीस यांनी  नागपुरात स्पष्ट केले होते. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोक्त आरोप केले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे चिथावणीखोर ट्विट – बोम्मई यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमच्या राज्यातील जागा देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. महाराष्ट्रातील ज्या भागात कानडी बोलली जाते, उदा. सोलापूर, अक्कलकोट इत्यादी, तेसुद्धा आमच्याकडे यावेत, अशी आमची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याविषयी बोम्मई यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 2004 पासून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. पण अद्याप त्यांना यश आलेले नाही. ते येणारही नाही, हे निश्‍चित. आम्ही कायदेशीर लढाईत मजबूत आहोत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍नावर सकारात्मक वातावरण असल्याचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितले असले तरीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतल्याने हा वाद आता आणखी चिघळणार अशीच चिन्हे आहेत.

महाराष्ट्र काय असा-तसा वाटला का? अजित पवार – बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. ते महाराष्ट्र मागायला निघाले आहेत काय? महाराष्ट्र काय त्यांना असा-तसा वाटला का? असे म्हणत अजित पवार बोम्मई यांच्या वक्तव्यावर चांगलेच संतापले.

COMMENTS