Homeताज्या बातम्यादेश

औषधांच्या निर्यातीत 138 टक्क्यांनी वाढ

यंदा 90 हजार 324 कोटी रुपयांच्या औषधांची निर्यात

नवी दिल्ली प्रतिनिधी - भारतातील डॉक्टर्स, अभियंत्यांना जशी विदेशात मागणी आहे, तशीच भारतीय औषधांना देखील मागणी आहे. मागील आठ वर्षांच्या कालावधीत औ

भायखळा आयटीआयमध्ये २९ ट्रेडसाठी १५०० जागा उपलब्ध
ट्रकचा कट लागल्याने दुचाकीस्वार जागीच ठार | LOK News 24
‘झोपु’ योजनांसाठी आठ वित्तीय संस्थांची तयारी

नवी दिल्ली प्रतिनिधी – भारतातील डॉक्टर्स, अभियंत्यांना जशी विदेशात मागणी आहे, तशीच भारतीय औषधांना देखील मागणी आहे. मागील आठ वर्षांच्या कालावधीत औषधांच्या निर्यातीत 138 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी ( दि.23) दिली. वर्ष 2013-14 मध्ये देशातून 37 हजार 988 कोटी रुपयांच्या औषधांची निर्यात झाली होती, त्या तुलनेत वर्ष 2021-22 मध्ये 90 हजार 324 कोटी रुपयांच्या औषधांची निर्यात झाली आहे.
औषध निर्यातीच्या क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण होत असल्याचे सांगून मंडाविया पुढे म्हणतात की, ‘वन अर्थ, वन हेल्थ‘ दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून भारत जगातील बहुतांश देशांना औषधांचा पुरवठा करीत आहे. केवळ औषधेच नव्हे तर कोरोना नियंत्रणासाठीच्या लसींसह इतर लसींचा पुरवठा विविध देशांना केला जात आहे. चांगला दर्जा आणि परवडणार्‍या किंमती यामुळे मागील काही वर्षांत भारतीय औषधांच्या मागणीत वाढ झालेली आहे. गेल्या मे महिन्याची आकडेवारी पाहिली तर जगाला पुरवठा होत असलेल्या 80 टक्के लसींचा व 20 टक्के जेनेरिक औषधांचा पुरवठा भारतातून केला जात आहे. देशातून एकूण निर्यात केल्या जाणार्‍या वस्तुंचा विचार केला तर 5.92 टक्के औषधांचा त्यात समावेश आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या प्रगतशील क्षेत्रांमध्ये भारतीय औषधांची मागणी वाढली आहे. कोरोना संकटाच्या काळात लॉकडाउन, पुरवठा साखळीतील अडथळे आदी समस्या होत्या; पण तरीही त्या काळात देशातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात झाली होती, असेही मंडाविया यांनी सांगितले आहे.

COMMENTS