विजय देवरकोंडा करणार अवयव दान

Homeताज्या बातम्यामनोरंजन

विजय देवरकोंडा करणार अवयव दान

लोकप्रिय साऊथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)कायमच चर्चेत असतो. मात्र यावेळी तो एक खास कारणासाठी चर्चेचा विषय ठरत आहे.विजय देवरकोंडाने असा न

लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू
अनन्या पांडेचा नवा प्रमोशन फंडा.
विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी

लोकप्रिय साऊथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)कायमच चर्चेत असतो. मात्र यावेळी तो एक खास कारणासाठी चर्चेचा विषय ठरत आहे.विजय देवरकोंडाने असा निर्णय घेतला आहे जो ऐकून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल.विजयने आपल्या शरिरातील सर्व अवयव दान करणार असल्याची घोषणा केली आहे. विजय देवरकोंडा नुकताच अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. जिथे त्याने अवयवदानाबाबत सविस्तर चर्चा केली.अवयव दान करण्याबाबत विजय म्हणाला, ‘मला वाटते मी माझे सर्व अवयव दान करेन. मी गेल्यानंतर इतर कोणाला त्याचा उपयोग झाला आणि त्यांना जगण्यास मदत झाली तर मला ते आवडेल. माझे अवयव वाया घालवून काही उपयोग आहे.”मी तंदुरुस्त राहतो आणि स्वतःला निरोगी ठेवतो. मी आणि माझ्या आईने आमचे अवयव दान करण्यासाठी नोंदणी केली आहे’, असंही विजयने सांगितलं.विजयच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

COMMENTS