मंत्री गडाखांनी राजीनामा देण्याची मुरकुटेंची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री गडाखांनी राजीनामा देण्याची मुरकुटेंची मागणी

जलसंधारण खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा दावाअहमदनगर/प्रतिनिधी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जलसंधारण खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तात्काळ राजीन

स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे
बकरी ईद निमित्त नगर येथे मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण केले
झोपलेल्या चालकाला मारहाण करून गाडी व पैसे पळवले

जलसंधारण खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा दावा
अहमदनगर/प्रतिनिधी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जलसंधारण खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.
याबाबत मुरकुटे म्हणाले की, जलसंधारण विभागाच्या खात्यामध्ये साडेसहाशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या भ्रष्टाचाराची पोलखोल केली व हा भ्रष्टाचार जनतेसमोर आणला आहे. याची जबाबदारी स्वीकारून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करून मुरकुटे म्हणाले, ते या खात्याचे निष्क्रिय मंत्री असून त्यांचे खात्याकडे लक्ष नाही. त्यांच्या मतदारसंघातील जनतेला विविध प्रश्‍नांसाठी झगडावे लागत आहे. ते काय राज्याचे प्रश्‍न सोडविणार?, जलसंधारण विभागाकडे मंत्रीमहोदयांचे दुर्लक्ष आहे. त्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे व याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मुरकुटे यांनी केली.

मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले
जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्याचा आरोपही मुरकुटे यांनी केला असून, मुळा धरणातून शेतकर्‍यांसाठी आवर्तन सोडावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. याबाबत त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. 15 ते 20 दिवसापासून पाऊस गायब झाला असल्यामुळे शेतकर्‍यांची उभी पिके जळू लागली आहे. शेतकरी आधीच कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पिके वाचविण्यासाठी मुळा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी अवर्तन सोडावे. शेतकर्‍यांच्या हाता तोंडाला आलेली उभी पिके जळून चालली आहे. येत्या आठ दिवसात शेतीसाठीचे आवर्तन सोडावे. अन्यथा, शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा या निवेदनात मुरकुटेंनी दिला आहे. महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांना मुरकुटे यांनी निवेदन दिले. यावेळी रितेश भंडारी, तुळशीराम झगरे, भाऊराव नगरे,अमित गटणे आदी उपस्थित होते.

मंत्री एसीमध्ये बसून राहतात
जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. पालकमंत्री व जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मी आमदार असताना मुळा धरणातून वेळेवर शेतकर्‍यांसाठी आवर्तन सोडली होती. तरीसुद्धा सध्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी त्यावेळी रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करत आंदोलन केले होते. आता तर ते राज्याच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री आहेत. आता कुठे गेला शेतकर्‍यांचा पाणीदार नेता? नेवासा तालुक्यातील जनतेची त्यांनी दिशाभूल केली आहे, मतदार संघात ते दिसत नाही. शेतकर्‍यांच्या व्यथा मुंबईमध्ये राहून कळत नसतात. त्यासाठी मतदार संघात शेतकर्‍यांशी संवाद साधावा लागतो, परंतु मंत्रीमहोदय मुंबई येथे एसीमध्ये बसून राहतात, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत त्यांना आता विसर पडला आहे, असा आरोप मुरकुटे यांनी केला.

COMMENTS