Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाठारला महिलांच्या ग्रामसभेत दारू दुकान-बिअर बारला विरोध

कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील वाठार येथे आज महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत देशी- विदेशी दारू, वाईन शॉप आणि बियर बार द

शिवशाही सरपंच संघाकडून स्व. शिवाजीराव देसाई आदर्श ग्रामसह आदर्श सरपंच पुरस्कार
खा. शरद पवार साहेब यांच्या घरावरील हल्ल्याचा पाटणमध्ये निषेध
म्हैसाळ आत्महत्या प्रकरणी आणखी तिघांना अटक; अटक आरोपींची संख्या पोहचली 18 वर; आणखी सात जण पोलिसांच्या रडारवर

कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील वाठार येथे आज महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत देशी- विदेशी दारू, वाईन शॉप आणि बियर बार दुकानांना परवानगी देण्यावर चर्चा करण्यात आली. महिलांनी हातवर करत एकमुखाने परवाना नामंजूर केला. गुरुवार, दि. 17 रोजी पुरूषांची ग्रामसभा होणार आहे.
वाठार ग्रामपंचायतीने आजच्या सभेत 10 विषयाची सभा आयोजित केली होती. त्यामध्ये 2 नंबरचा विषय गावात हा देशी- विदेशी दारू दुकान (वाईन शॉप) आणि बिअर बारला परवाना देण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच शोभाताई पाटील, उपसरपंच बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मोरे, रंजना माने, स्वप्निल कानडे, अभिजीत पाटील, ग्रामसेवक रियाज मोमीन, क्लार्क अनिकेत माने उपस्थित होते.
ग्रामसेवक रियाज मोमीन यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. यावेळी ते म्हणाले, गावात दारू व बिअर बार परवान्यासाठी दोन अर्ज आले आहेत. आबासाहेब भिमराव पाटील (रा. वाठार) यांना स्वमालकीच्या जागेत बिअर बार व दारू दुकान सुरू करण्यासाठी ना हरकत दाखल मिळावा, असा अर्ज आला आहे. यावर महिलांचे काय मत आहे, असे ग्रामसेवकांनी विचारताच महिलांनी एकमुखाने हात वर करत विरोध दर्शवला.

COMMENTS