Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारत २०२३ मध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा देश! 

जगाने मंगळवारी म्हणजे १५ नोव्हेंबर २०२२ आपल्या ८ अब्ज लोकसंख्येचा आकडा गाठला आहे.  मानवी समाजात ही बाब एक उल्लेखनीय मैलाचा दगड ठरला आहे. त्याचप्र

राम, नेमाडे आणि समाज !
‘आप’ चा निर्णय ओबीसींच्या दृष्टीने!
अंबड ओबींसीं महासभा निमित्ताने…….

जगाने मंगळवारी म्हणजे १५ नोव्हेंबर २०२२ आपल्या ८ अब्ज लोकसंख्येचा आकडा गाठला आहे.  मानवी समाजात ही बाब एक उल्लेखनीय मैलाचा दगड ठरला आहे. त्याचप्रमाणे भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश म्हणून २०२३ मध्ये ठरेल असं भाकित देखील संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या विषयक अहवालात आला आहे. भारत हा साहजिकच चीन पेक्षा अधिक लोकसंख्या असणारा देश म्हणून जगातील सर्वात अधिक लोकसंख्या असणारा देश ठरेल. युनायटेड नेशन्स ने जागतिक लोकसंख्येला “उल्लेखनीय मैलाचा दगड” असे वर्णन केले आहे. सन १८०० पर्यंत सहस्राब्दीपर्यंत मानवी लोकसंख्या एक अब्जाहून कमी होती आणि एक ते दोन अब्जांपर्यंत वाढण्यास शंभर वर्षांहून अधिक काळ लागला. जग सात अब्ज आठ अब्जांपर्यंत अवघ्या १२ वर्षांत पोहोचले. आमच्या लोकसंख्येची वाढ ही मानवतेच्या उपलब्धींचा पुरावा आहे, ज्यात गरिबी आणि लैंगिक असमानता कमी करणे, आरोग्य सेवेतील प्रगती आणि शिक्षणाचा विस्तारित प्रवेश समाविष्ट आहे,” असंही आपल्या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातील अंदाजा नुसार २०३७ च्या आसपास नऊ अब्ज आणि २०५८ च्या आसपास दहा अब्ज एवढी जगाची लोकसंख्या असण्याचा अंदाज वर्तवला आहे. यूएनच्या अंदाजानुसार २०८० च्या दशकात जगाची लोकसंख्या सुमारे साडेदहा अब्ज एवढी असेल. मात्र, यानंतर काही काळ लोकसंख्या स्थिर राहण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे २०२३ हे वर्ष भारतासाठी ऐतिहासिक वर्ष ठरू शकते; कारण ते चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्याचा अंदाज आहे. २०५० मध्ये भारताची लोकसंख्या १ अब्ज, ६७ कोटी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या शतकाच्या मध्यापर्यंत चीनच्या १ अब्ज ३१ कोटी लोकसंख्येच्या भारत पुढे जाण्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या याच अहवालाच्या अंदाजानुसार, २०२२ मध्ये भारतातील सुमारे ६८ टक्के लोकसंख्या १५-६४ वयोगटातील आहे, तर उर्वरित ६५ आणि त्याहून अधिक वयोगटातील लोक लोकसंख्येच्या सात टक्के आहेत..संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, भारतातील २७ टक्के लोकसंख्या १५ ते २९ वयोगटातील आहे. २०५३ मध्ये भारत जगातील सर्वात मोठ्या किशोरवयीन लोकसंख्येचे घर आहे. लोकसंख्येचा हा अंदाज जग आणि भारत यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोरोना काळानंतर जगाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी भीतीयुक्त चर्चा जगभरातील लोकांमध्ये होती. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाच्या या अहवालामुळे ही भीतीच निकाली निघाल्याचे दिसते आहे. कोरोना काळात जाणवली अधिक विषमताकोरोना साथीच्या काळात जगातील विषमतेच्या दरीचे अधिक भेसूर दर्शन झाले. अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडे पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होत्या. तर गरीब देशांकडे लसींचा मोठा तुटवडा होता. ही दरी अद्याप भरून निघालेली नाही. तिसऱ्या जगातील गरीब देशांमध्ये तसेच भारत, चीनसारख्या विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण मोठे आहे. तीस वर्षांपूर्वीच भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकणार, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, हा अंदाज २०२३ मध्ये सत्यात उतरणार असल्याचेही या अहवालातून स्पष्ट होते. चीनने आपल्या एक कुटुंब एक अपत्य या धोरणामुळे लोकसंख्येवर नियंत्रण करण्यात बरेच यश मिळवले आहे; परंतु, भारताला लोकसंख्या वाढीच्या वेगावर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. 

COMMENTS