बीड प्रतिनिधी - बीडमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुदत संपलेला डोस दीड वर्षाच्या बाळाला (Baby) पाजण्यात आल्याची संतापजनक
बीड प्रतिनिधी – बीडमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुदत संपलेला डोस दीड वर्षाच्या बाळाला (Baby) पाजण्यात आल्याची संतापजनक घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. बीडच्या माजलगाव शहरात असणाऱ्या पवार हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यानंतर बाळाच्या आजोबांनी रुग्णालयाविरोधात थेट आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. तर या डोसमुळे काही परिणाम होणार नाही. बाळाला आम्ही पुन्हा डोस देणार आहोत. असे स्पष्टीकरण डॉक्टर पवार यांनी दिलं आहे. यामुळे आता आरोग्य विभाग काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागलं आहे. यामुळे बाळाच्या नातेवाईकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
COMMENTS