Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृष्णा पूलावरून नदीत उडी घेत युवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

कराड / प्रतिनिधी : कॉलेज मार्गावर असलेल्या कृष्णा पूलावरून एका कॉलेज विद्यार्थ्यांने नदी पात्रात उडी घेतली. आत्महत्या करण्यासाठी उडी घेतलेला विद्यार्

मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही. आर. जोशी
परजिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी पशुधनाच्या लसीकरणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
विशाळगडावरील अतिक्रमणे महाशिवरात्रीपूर्वी काढणार

कराड / प्रतिनिधी : कॉलेज मार्गावर असलेल्या कृष्णा पूलावरून एका कॉलेज विद्यार्थ्यांने नदी पात्रात उडी घेतली. आत्महत्या करण्यासाठी उडी घेतलेला विद्यार्थी अद्याप आढळून आला नाही. या प्रकारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी व पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी कृष्णा पूलावर धाव घेतली आहे. कृष्णा पूलाच्या खाली नदीपात्रात उडी घेललेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कराड पोलिसांनी पूलावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
विद्यालयीन विद्यार्थ्याच्या अद्याप दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या नाहीत. परंतू महाविद्यालयीन विद्यार्थीचे कॉलेज 31 ऑक्टोंबरपासून सुरू झाले आहे. तसेच काही विद्यानगर परिसरातील कॉलेजेस, क्लासेस सुरू असल्याने कृष्णा पुलावरून रोज शेकडो विद्यार्थी- विद्यार्थींनी चालत ये-जा करतात. आज दुपारी कॉलेजकडून कराडकडे येत असलेल्या विद्यार्थ्यांने कृष्णा पुलाच्या मध्यावरून नदीपत्रात उडी घेतली. त्यावेळी त्याच्या पाठीमागून येत असलेल्या दोघांनी हा प्रकार पाहिला. मात्र, ते त्या विद्यार्थ्याला वाचवू शकले नाहीत. विद्यार्थ्याने नदीपात्रात उडी घेतली. संबंधित विद्यार्थ्यांने नदीत उडी टाकल्यानंतर काही वेळाने तो अनेकांना दिसला. मात्र, त्यानंतर दिशेनास झाला. ज्या ठिकाणी उडी टाकली, त्या ठिकाणी पाणी कमी आहे. पुलावरून जाणार्‍यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

सध्या कृष्णा पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्या विद्यार्थ्यांचा नदीपात्रात शोध घेण्याचे काम सुरू आहे. कृष्णा पूलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. संबंधित विद्यार्थी कोणत्या कॉलेजचा, कोणत्या गावचा, त्याचे नांव काय आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, कॉलेजच्या गणवेशातील विद्यार्थ्यांने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली.

COMMENTS