Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवड पोलिसांकडून वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई

म्हसवड / वार्ताहर : चार चाकी व दुचाकी वाहनांवर यापुढे रेड रिप्लेक्टर नसल्यास व चालकाने मद्यपान केलेले आढळल्यास त्या चालकाला ताब्यात घेवून दंडात

पाटण तालुक्यात 23 जानेवारीपासून कुणबी दाखले वितरण
कराड मंडई परिसरात राडा; तलवार हल्ल्यात एक गंभीर
शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करुन कोरोना प्रतिबंधक साधनसुविधा पुरविण्याची शिक्षक परिषदेची मागणी

म्हसवड / वार्ताहर : चार चाकी व दुचाकी वाहनांवर यापुढे रेड रिप्लेक्टर नसल्यास व चालकाने मद्यपान केलेले आढळल्यास त्या चालकाला ताब्यात घेवून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम म्हसवड पोलिसांनी हाती घेत पहिल्याच दिवशी 5 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
प्रत्येक वाहनांच्या पाठीमागील बाजूस रेड रिफ्लेक्टर बंधनकारक असताना शहरात व परिसरात अनेक वाहने रिफ्लेक्टर न लावता रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे अनेक अपघात होऊन कित्येकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. ट्रॉलीसह असणारे ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्यामुळे व रात्रीच्या वेळी अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत होती.
म्हसवड पोलीस दलातील वाहतुक शाखेने केलेल्या या कारवाईचा धसका माळशिरस, आटपाडी तालुक्यातील वाहन चालकांनी चांगला घेतला आहे. या परिसरातून येणारे वाहन चालक बसस्थानक चौकात पोलीस आहेत का? याची हमखास चौकशी करत आहेत. म्हसवड पोलिसांना आदेश मिळताच वाहन चालकाविरोधात कारवाई सुरु केली. यापुढे म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत रिफ्लेक्ट शिवाय कोणतेही वाहन व मद्य प्राशन करुन वाहन चालवताना आढळुन आल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा सपोनि राजकुमार भुजबळ यांनी दिला आहे.

COMMENTS