भरधाव कारच्या धडकेत 8 वारकर्‍यांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव कारच्या धडकेत 8 वारकर्‍यांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी 5 लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.

सोलापूर : सोलापूर(Solapur) जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधल्या जुनोनी गावात भरधाव कारने दिलेल्या धडकेत 8 वारकर्‍यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घड

दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
  दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं  

सोलापूर : सोलापूर(Solapur) जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधल्या जुनोनी गावात भरधाव कारने दिलेल्या धडकेत 8 वारकर्‍यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे वारकरी कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला निघाले होते.
यासंदर्भातील माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील काही भाविक कार्तिकी यात्रेसाठी 32 जणांची दींडी निघाली होती. ही दिंडी सोमवारी सायंकाळी 7 वाजता सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता मिरजेकडून भरधाव वेगाने येणार्‍या कार ( क्रमांक एमएच 12 डीई 8938 ) दिंडीत घुसली आणि तब्बल 16 वारकर्‍यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. यात 8 वारकर्‍यांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकर्‍यांमध्ये 5 महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर धडक देणार्‍या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी 5 लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर संदेश जारी करत ही मदत जाहीर केली.

COMMENTS