आक्रोश मोर्चाप्रकरणी 46 आंदोलकांवर गुन्हे दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आक्रोश मोर्चाप्रकरणी 46 आंदोलकांवर गुन्हे दाखल

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापुरात 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या

राज्यात आगामी चार दिवस थंडीचे
आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोचा झाला अपघात
सातार्‍यात मद्य विक्रीच्या धोरणास ‘अंनिस’चा विरोध

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापुरात 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले होते. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मराठा आक्रोश मोर्चा काढल्याने सोलापूरच्या फौजदारी चावडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मोर्चाचे समनव्यक किरण पवार, राम जाधव यांच्यासह माजी आमदार नरेंद्र पाटील, खासदार डॉ. जय सिद्धेश्‍वर शिवाचार्य, खासदार रणजित निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह 46 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

COMMENTS