बच्चू कडूंसोबतचा वाद मी संपवतो; रवी राणा यांची माघार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बच्चू कडूंसोबतचा वाद मी संपवतो; रवी राणा यांची माघार

फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणा यांची माघार

मुंबई प्रतिनिधी - अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बच्चू कडू आणि रवी राणांच्या वादावर आता अखेर पडदा पडला आहे. फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणांनी गुवाहा

डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट होणे गौरवास्पद ः डॉ. शिवाजी काळे
आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना
गेवराई पोलिसांनी हॉटेलमध्ये २५ किलो गांजा पकडला

मुंबई प्रतिनिधी – अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बच्चू कडू आणि रवी राणांच्या वादावर आता अखेर पडदा पडला आहे. फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणांनी गुवाहाटी आणि ५० खोक्यांच्या आपल्या विधानांवरून माघार घेतली आहे. बच्चू कडूंसोबतचा वाद मी संपवतो आहे, असं रवी राणांनी माध्यमांसमोर जाहीर केलं आहे. फडणवीस आमचे नेते असून त्यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असल्याचं रवी राणांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे, बच्चू कडूंनीही आपले काही अपशब्द मागे घ्यावेत अशी अपेक्षाही रवी राणांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS