“तुम्ही जर जिवंत आईचं दूध प्यायला असाल तर माझ्या फोनवर धमकी देऊन बघा”

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“तुम्ही जर जिवंत आईचं दूध प्यायला असाल तर माझ्या फोनवर धमकी देऊन बघा”

शिवसेनेकडून गुलाबराव पाटलांना मोठा इशारा

जळगाव प्रतिनिधी- राज्यभरातील शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप शिवसेना पक्षप

“खापर पणजा येऊ दे खाली आडवा केल्याशिवाय राहणार नाही”
Jalgaon : जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार | LokNews24
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage

जळगाव प्रतिनिधी– राज्यभरातील शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून केला जातोय. विशेष म्हणजे याच धमक्यांच्या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत(Sanjay Sawant) यांनी जळगावचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांना थेट इशाराच दिला आहे. “तुम्ही जर जिवंत आईचं दूध प्यायला असाल तर माझ्या फोनवर धमकी देऊन बघा, जे ठिकाण सांगाल तिथे उभा राहून तुमच्याशी दोन हात नाही केले तर बाळासाहेबांचा शिवसैनिक नाव लावणार नाही. धमकी आम्हालाही देता येते. आम्ही केवळ धमकी देणार नाही. तर यापुढचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही”, असा इशारा संजय सावंत यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे.

COMMENTS