कर्नाटकात भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्या

कर्नाटकात भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

टेम्पो ट्रॅव्हलर आणि दूध नेणार्‍या वाहनात भीषण टक्कर होऊन हा अपघात घडला.

बंगळुरू प्रतिनिधी:- कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. टेम्पो ट्रॅव्हलर आ

अमृतसरहून माता वैष्णोदेवीला जाणारी बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील अपघातात तिघांचा मृत्यू
झारखंडमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू

बंगळुरू प्रतिनिधी:- कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. टेम्पो ट्रॅव्हलर आणि दूध नेणार्‍या वाहनात भीषण टक्कर होऊन हा अपघात घडला. यासंदर्भातील माहितीनुसार सुब्रमण्य, हसनंबा मंदिरांना भेट देऊन घरी परतत असताना अरसेकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि केएमएफ दूध वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात हासन जिल्ह्यातील अरसेकेरे तालुक्यातील गांधी नगर गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा झाला. शिमोगा- अरसेकरे येथील राष्ट्रीय महामार्ग 69 वर हा भीषण अपघात झाला असून यात लीलावती (50), चैत्र (33), समर्थ (10), डिम्पी (12), तन्मय (10), ध्रुव (2), वंदना (20), दोड्डाय्या (60), भारती (50) यांचे निधन झाले. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळाच्या मंजुनाथाचे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. ते सर्व जण झोपेत असताना हा अपघात घडल्याची माहिती पुढे आली.

COMMENTS