Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परतीच्या पावसाने हेळगावसह कालगाव परिसरास झोडपले

मसूर / वार्ताहर : हेळगावसह कालगाव व परिसरास परतीच्या पावसाने झोडपून काढले. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन तसेच भुईमुग पिकाचे मोठे नुकसान झाल्याने

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी
घरासमोर झोपलेल्या तरूणाचा निर्घृण खून
मसूर-वडूज-पुसेसावळीतील दरोडा उघडकीस आणण्यात यश

मसूर / वार्ताहर : हेळगावसह कालगाव व परिसरास परतीच्या पावसाने झोडपून काढले. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन तसेच भुईमुग पिकाचे मोठे नुकसान झाल्याने झाल्याने शेतकर्‍यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
शुक्रवारी दुपारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली परिसरात सोयाबीन काढणी, भुईमुगाची काढणी सुरू असल्याने अचानक आलेल्या पावसाने भुईमुगाचे काढलेल्या शेंगा भिजून गेल्या. काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पिक कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसामुळे पेरलेले कडधान्य वाया गेले आहे. आता काढणीला आलेले सोयाबीन पावसामुळे वाया जाणार असे दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नगदी पीक म्हणून शेतात सोयाबीनची टोकनी केली जाते. दिवाळीच्या तोंडावर त्याची काढणी होऊन हातामध्ये पैसा येत असल्याने दिवाळी गोड होते. परंतू परतीच्या पावसाने सोयाबीन हाती येणार नसल्याने शेतकरी गांगरून गेले आहेत. भुईमुगाच्या घरी आणलेल्या शेंगा पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे त्याला बुरशी येऊ लागली आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

COMMENTS