Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे नुकसान

औंध / वार्ताहर : औंध, पळशी, गोपूज, वाकळवाडीसह परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केल

प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करु : ना. उदय सामंत
कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा भांडाफोड लवकरच होणार
पोलिसांनी अवैध व्यवसाय बंद न केल्यास भाजपा बंद करणार : धैर्यशील मोरे

औंध / वार्ताहर : औंध, पळशी, गोपूज, वाकळवाडीसह परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले. पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी सकाळपासूनच पावसाची भुरभूर सुरु होती. थोडी उघडीप दिल्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाने सुरवात केल्यानंतर सुमारे दीड ते दोन तास पावसाने हजेरी लावली होता. या पावसामुळे पळशी येथील अनेकांच्या बटाटा पिकात पाणी शिरून नुकसान झाले. गोपूज येथील सागर तानाजी घार्गे यांच्या घराची भिंत पडली. घर बंद असल्याने अनर्थ टळला. परिसरातील अनेकांच्या रानात पाणी साचले आहे. ठिकठिकाणी ऊसही पडले आहेत. हातातोंडाला आलेले बटाटा पीक काढणीला आले असून शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. नुकसान झालेल्या ठिकाणची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी माजी सभापती शिवाजीराव पवार यांनी केली आहे.

COMMENTS