Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसच्या गतवैभवासाठी कामाला लागा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन

वाई / प्रतिनिधी : देशात महागाई, बेरोजगारीमुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. केंद्र सरकार यातून मार्ग काढत नाही. प्रादेशिक पक्षात ताकद राहिली नाही. म

इस्लामपूर नगरपालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा
रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी
हुंबरळी शाळेस कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा

वाई / प्रतिनिधी : देशात महागाई, बेरोजगारीमुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. केंद्र सरकार यातून मार्ग काढत नाही. प्रादेशिक पक्षात ताकद राहिली नाही. मात्र, सर्वसामान्य माणसांच्या मनात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे. सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. ते गतवैभव मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी हिमतीने कामाला लागावे. वाई तालुक्यातही काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
बावधन (ता. वाई) येथील कृष्णाई कार्यालयात तालुका काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सुनील बाबर, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, हनुमंत पिसाळ, मंजिरी पानसे, बाळासाहेब कोठावळे, सचिन काटे, आकाश पोळ आदींसह तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून, या पक्षाचा विचार, बलिदान व इतिहास पुसून टाकता येणार नाही. यशवंतराव चव्हाण, स्वातंत्र्य सैनिक किसन वीर यांच्या विचाराने वाई तालुक्याची जडणघडण झाली. तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी विलास पिसाळ यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष वाढवावा.
तालुकाध्यक्ष विलास पिसाळ म्हणाले, काँग्रेसच्या विचारधारेत वाढलेला कार्यकर्ता किती संकटे आली, तरी पक्षाची फारकत घेणार नाही. पक्ष टिकवण्यासह वाढवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यात काँग्रेस पक्ष घराघरात पोचवू.
यावेळी प्रांतिक प्रतिनिधी राजेंद्र शेलार, सेवादल अध्यक्ष प्रताप देशमुख, माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे, युवक अध्यक्ष प्रमोद अनपट, प्रदेश महासचिव जयदीप शिंदे, किसन पक्षाचे धनराज कांबळे यांची भाषणे झाली. अतुल संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले. तेजपाल वाघ यांनी आभार मानले.

COMMENTS