मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा एकदा गुरुवारी राज्यात अनेक जिल्ह्यात कोसळतांना दिसून आला. मात्र याचबरोबर मान्सूनचा परत

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे  – आ. राम सातपुते 
स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून उलगडणार सर्जिकल स्ट्राइकचा थरार| फिल्मी मसाला | LokNews24 |
पाडव्याच्या खरेदीला उसळळी गर्दी ; कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा एकदा गुरुवारी राज्यात अनेक जिल्ह्यात कोसळतांना दिसून आला. मात्र याचबरोबर मान्सूनचा परतीचा प्रवास देखील सुरु झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दिल्लीतून मान्सूनने माघार घेतली असून, हळूहळू दक्षिण भारतातून माघार घेत, तो संपूर्ण भारतातून परतीचा प्रवास सुरु होणार आहे.
पोषक हवामानामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवासाला 20 सप्टेंबरला सुरवात झाली होती. त्यावेळी मॉन्सून गुजरात व राजस्थानच्या काही भागातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर मॉन्सूनच्या परतीचा प्रवास आठवडाभरापेक्षा अधिक काळासाठी थांबला होता. त्यात यंदा मॉन्सूनने सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली होती. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा चालनापुणे – नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या (मॉन्सून) परतीचा प्रवास गेल्या आठवड्याभरापासून थांबला होता. त्यास गुरुवारी (ता. 29) पुन्हा चालना मिळाली आहे. दरम्यान मॉन्सूनने गुरुवारी वायव्य भारतातील आणखीन काही भागातून परतल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.पोषक हवामानामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास परतीच्या प्रवासाला सुरवात झाल्यानंतर त्याला पुन्हा ‘ब्रेक’ लागला होता. परंतु गुरुवारी परतीच्या प्रवासाला पुन्हा वेग आला असून मॉन्सून संपूर्ण पंजाब, चंडीगड, दिल्ली तसेच जम्मू काश्मीर, हरियाना, हिमाचल प्रदेशसह उत्तर प्रदेशच्या काही भागातून तर राजस्थानच्या आणखीन काही भागातून परतला आहे.

COMMENTS