अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत यांची माघार; सोनिया गांधींची मागितली माफी

Homeताज्या बातम्यादेश

अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत यांची माघार; सोनिया गांधींची मागितली माफी

नवी दिल्ली/प्रतिनिधी : काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ आणि विश्‍वासू नेते म्हणून असणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या

काँगे्रस प्रवक्ते राजू वाघमारेंनी सोडली पक्षाची साथ
काँगे्रसमध्ये विलीन होण्याचा प्रश्‍नच नाही ः सुप्रिया सुळे
श्रमिक नगर सातपूर येथे श्री. संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुरान कथेची सांगता

नवी दिल्ली/प्रतिनिधी : काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ आणि विश्‍वासू नेते म्हणून असणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र एक पद एक व्यक्ती या न्यायाने त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार होते. मात्र राजस्थानातील आमदारांच्या बंडानंतर गेहलोत यांचा पत्ता कट करण्यात आला असून, पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची गुरुवारी भेट घेत त्यांची माफी मागितली.
राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटाबाबत सोनिया गांधींची माफी मागितल्याचे गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार की नाही, याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी घेतील, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. मी काँग्रेसमध्ये एका प्रामाणिक सैनिकाप्रमाणे काम करत आहे. पक्ष नेतृत्वाने विश्‍वास दाखवून आजपर्यंत अनेक जबाबदार्‍या दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाचा एका ओळीचा प्रस्ताव मी पारित करू शकलो नाही, याचे दु:ख मला आयुष्यभर असेल. राजस्थानमध्ये घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेत मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे, असे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या नावाला काँग्रेस नेतृत्वाची सर्वाधिक पसंती होती. मात्र, आता या शर्यतीतून गेहलोत यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय सिंह विरुद्ध शशी थरुर आमनेसामने येणार आहेत. काँग्रेसच्या अधिसूचनेनुसार, निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख 1 ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. उमेदवारांची अंतिम यादी 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

COMMENTS