माझ्या जावयामुळे मी गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझ्या जावयामुळे मी गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले

आरक्षणाबाबत सुशीलकुमार शिंदेंचा मोठा खुलासा

सोलापूर प्रतिनिधी - सुशीलकुमार शिंदे(Sushil Kumar Shinde)  हे मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाबाबत आता सु

ऊस कारखाना फायद्यात आणण्यासाठी ‘इथेनॉल’ निर्मिती कडे वळावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ
महापरिनिर्वाण दिनी सरकारी सुट्टी जाहीर
अकोलेकरांच्या दिवाळीची सुरमय सुरुवात

सोलापूर प्रतिनिधी – सुशीलकुमार शिंदे(Sushil Kumar Shinde)  हे मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाबाबत आता सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. माझा जावई गुजराती आहे. माझ्या जावयामुळे मी गुजराती समाजाला आरक्षण दिल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर हे सगळे करावेच लागते, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. तसेच लोकांना आता मी केलेल्या या कामाचा विसर पडल्याचेही शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना शिंदे यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पक्षातील लोकांनीच मला कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरू काढले, मात्र त्यांचा त्यानंतर कायमच पराभव झाला असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS