नवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही

वर्षा भोयर यांचा ईशारा

अमरावती : अमरावती मधील 19 वर्षीय युवती काही दिवसांपुर्वी तिच्या घरून न सांगता निघून गेली होती. या प्रकरणी तिच्या पालकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये

नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल
नवनीत राणा सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री.
नवनीत राणा यांची लायकी नाही…; आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू.

अमरावती : अमरावती मधील 19 वर्षीय युवती काही दिवसांपुर्वी तिच्या घरून न सांगता निघून गेली होती. या प्रकरणी तिच्या पालकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती,.यानंतर राजापेठ पोलीसांनी एका युवकास ताब्यात घेतले मात्र त्याच्याकडे या मुलीविषयी कुठलीच माहीती नव्हती. सदर युवक हा एका विशिष्ठ धर्माचा असल्याने अमरावती मधील काही राजकीय नेत्यांनी या प्रकणाला लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि या करीता खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी सुध्दा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता. त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती, याच पार्श्वभूमीवर आता पोलीस कर्मचार्याची पत्नी असलेल्या वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना सज्जड दम भरलाय तसेच नवनीत राणांना आता सोडणार नसल्याचा ईशाराही दिला आहे.

COMMENTS