धुळे प्रतिनिधी - सियाचीन भागात ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत असताना भारतीय सैन्य दलाचे धुळे तालुक्यातील न्याहळोद गावातील रहिवासी असलेल्या मनोहर पाटी
धुळे प्रतिनिधी – सियाचीन भागात ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत असताना भारतीय सैन्य दलाचे धुळे तालुक्यातील न्याहळोद गावातील रहिवासी असलेल्या मनोहर पाटील(Manohar Patil) यांना देश सेवा बजावत असताना वीर मरण आले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती धुळे जिल्हा प्रशासनाने दिली आहे. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील मनोहर रामचंद्र पाटील हे हवालदार पदावर भारतीय सेनादलात २००२ मध्ये भरती झाले होते. सध्या ते फिल्ड वर्कशॉप येथे भारतीय सैन्यात अत्यंत थंडीचे ठिकाण समजले जाणारे सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी ऑपरेशन मेघदूत मध्ये सेवा बजावत होते. देश सेवा बजावत असताना त्यांना १६ जुलै रोजी तेथील हवामानातील दुष्परिणामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या गोठल्या गेल्या त्यामुळे त्यांना तीव्र डोकेदुखी आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याच दिवशी त्यांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली.
COMMENTS